Chitra Wagh News Updates esakal
महाराष्ट्र बातम्या

तुमचं पानितप निश्चित,निवडणुकीवरुन चित्रा वाघ यांचे महाविकास आघाडीला इशारा

तुम्ही वेगवेगळे लढा, एकत्र लढा, तालिबानला घेऊन लढा !

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांकडून तयारी सुरु झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. या निर्णयावर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ ( Chitra Wagh) यांनी ट्विट करुन टीका केली आहे. त्या म्हणतात, महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला चितपट करण्यासाठी महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, एकत्र लढणार ? तुम्ही वेगवेगळे लढा, एकत्र लढा, तालिबानला घेऊन लढा, नाहीतर मुस्लिम लीगला घेऊन लढा, तुमचं पानिपत निश्चित आहे, असा इशारा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) दिला आहे. (Chitra Wagh Challenge Mahavikas Aghadi For Upcoming Municipal Corporation Election)

नवी मुंबईत आज मंगळवारी (ता.२४) महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यात आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक आघाडी एकत्र लढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शशिकांत शिंदे, शिवसेनेचे विजय नाहटा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक आदी उपस्थित होते.

या प्रसंगी ३१ मे रोजी जाहीर होणाऱ्या आरक्षणानंतर जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT