Chitra Wagh Manipur Violence esakal
महाराष्ट्र बातम्या

Chitra Wagh : भाजप सरकार आलं म्हणून महिलांवर अत्याचार वाढलेत, असं म्हणायचं का? चित्रा वाघ यांचा थेट सवाल

ज्या पद्धतीने मणिपूरमध्ये झाले ती सुद्धा आपल्याच देशातील भगिनी होती - चित्रा वाघ

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधी यांची ही काय पहिली वेळ नाही, या आधीही त्यांनी लोकशाहीच्या मंदिरात चुकीचे वर्तन केले आहे.

ढेबेवाडी (सातारा) : मणिपूरप्रश्नी (Manipur) केंद्र सरकार बोलायला तयार आहे. मात्र, निमंत्रण देऊनही विरोधी पक्षच चर्चेला येत नाही. यामध्ये विरोधकांकडून कुठेतरी राजकारण आणले जातेय, अशी दाट शक्यता आहे, असे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी तळमावले येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तुम्ही राहुल गांधींवर बोललात; परंतु मणिपूर घटनेबाबत बोलला नाही, अशी टीका होत आहे, या प्रश्नांवर त्या म्हणाल्या, ‘‘ज्यांनी आरोप केले. त्यांनी मी फक्त राहुल गांधींवर (Rahul Gandhi) बोललेलेच ऐकलेले आहे. मणिपूरची घटना अतिशय वाईट आहे. देशात, राज्यात महिलांबाबत कुठेही घडणाऱ्या अशा घटनांचे समर्थन केलेच जाऊ शकत नाही.

ज्या पद्धतीने मणिपूरमध्ये झाले ती सुद्धा आपल्याच देशातील भगिनी होती. त्याच पद्धतीने पश्चिम बंगालमधील मालदामध्ये घटना घडली. राजस्थानमध्येही घटना घडत आहेत. मात्र, विरोधी पक्ष काही बोलायला तयार नाही. विरोधकांकडून कुठेतरी राजकारण आणले जातेय, याची शक्यता आहे.

मणिपूरमधील घटनेसंदर्भात बोलायला सरकार तयार आहे. मात्र, विरोधी पक्षाला निमंत्रण देऊन देखील चर्चेला येत नाहीत. राहुल गांधी यांची ही काय पहिली वेळ नाही, या आधीही त्यांनी लोकशाहीच्या मंदिरात चुकीचे वर्तन केले आहे.’’

राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘‘आमचं सरकार आले म्हणून अत्याचार वाढलेत, असे म्हणायचं का? अत्याचार हे चालूच आहेत; परंतु त्या वेळचे आणि आताच सरकार त्यावर काय भूमिका घेतेय हे महत्त्वाचे आहे. जेव्हापासून आमचे सरकार आले आहे, तेव्हापासून आरोपींना पाठीशी घातले गेलेले नाही, असंही चित्रा वाघ यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT