Chitra Wagh And Supriya Sule esakal
महाराष्ट्र बातम्या

महिला कुडमुडी ज्योतिषी, असे म्हणत चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका

चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत भाकित वर्तवले आहे. मुंबईत शिवसेनेची सत्ता येईल व महापौर शिवसेनेचाच असेल, असे सुळे म्हणाल्या. यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करुन टीका केली आहे. मुंबईत पूर्वी पदपथावर पोपट घेऊन बसणारे कुडमुडे ज्योतिषी दिसत. हल्ली ते असे क्वचितच दिसतात. (Chitra Wagh Criticize Supriya Sule For Shiv Sena Rule In Mumbai Municipal Corporation)

त्यातही महिला कुडमुडी ज्योतिषी भेटणे म्हणजे मुंबईकरांची पूर्वजन्मीची पुण्याईच फळाला आली म्हणायची, अशा शब्दांमध्ये चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज धुळे येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या प्रसंगी त्यांना मुंबई महापालिकेत सत्ता कोणाची येईल? तुम्हाला काय वाटत ? हे प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देताना सुळे म्हणाल्या. शिवसेनेचीच सत्ता मुंबईत येईल व शिवसेनेचाच महापौर होईल. मुंबई महापालिकेकडून कोरोना काळात चांगले काम झाले आहे, असे कौतुक त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT