Sanjay Shirsat Sushma Andhare Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Shirsat: सुषमा अंधारेंना धक्का! 'त्या' प्रकरणी संजय शिरसाटांना पोलिसांकडून क्लिन चीट

सुषमा अंधारे यांच्या विनयभंग प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांना क्लीनचिट

अंकिता खाणे (Ankita Khane)

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विनयभंग प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांना क्लीनचिट मिळाली आहे. पोलिसांनी संजय शिरसाट यांना क्लीनचिट देण्याचा निर्णय घेतला आहे. संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावेळी अंधारे तिथे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे समोर व्यक्ति नसल्यामुळे विनयभंग होत नाही असा निष्कर्ष देण्यात आला आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिलेल्या विनयभांगाच्या प्रकरणात संजय शिरसाट यांना पोलिसांकडून क्लीनचिट देण्यात आली आहे.(Latest Marathi News)

काय आहे प्रकरण?

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याच्या विरोधात सुषमा अंधारे यांनी परळी येथे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शिरसाट यांनी केलेलं वक्तव्य हे संभाजी नगर येथील असल्याचं सांगत हे प्रकरण संभाजी नगर पोलिसांकडे पाठवलं होतं. त्यानंतर पोलिसांनी याची चौकशी केली होती.(Latest Marathi News)

सुषमा अंधारे यांनी 3 आक्षेप घेतले होते. विनयभंग, बदनामी आणि अब्रू नुकसानीचा दावा त्यांनी केला होता. तर या प्रकरणात पोलिसांनी तपास केला. त्यानंतर पोलिसांनी सांगितलं की अंधारे यांनी वेगवेगळ्या प्रकरणात तक्रार दाखल केले होते. विनयभंग प्रकरणात संजय शिरसाट यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. या संबधीचे पत्र सुषमा अंधारे यांना चार दिवसांपूर्वी पत्र पाठवण्यात आले आहे.(Latest Marathi News)

संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

यावर संजय शिरसाट म्हणाले की, मी वारंवार सांगितलं होतं, मी काहीही चुकीच वक्तव्य केलं नव्हतं. एखाद्याला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे आता तरी त्यांना समजावं असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT