covaxin
covaxin 
महाराष्ट्र

नागपुरात कोरोना लसीची क्लिनिकल ट्रायल सुरु; अवघ्या जगाचे भारताकडे लक्ष....

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. सध्या कोरोनावर उपचार करण्यासाठी कोणतेही ठोस औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने रुग्णांवर रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणारे औषध दिले जात आहे. त्यामुळे कोरोनावरील ठोस उपचारासाठी भारतासह जगभरात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु आहे. त्यातही भारतातल्या संशोधनाकडे जगाचे लक्ष लागले आहे. त्याला कारण म्हणजे लवकरच भारतात सुरु होत असलेले क्लिनिकल ट्रायल्स.. 

भारत बायोटेकच्या Covaxinचे क्लिनिकल ट्रायल भारतात ज्या 12 ठिकाणी होत आहेत, त्यात नागपूरच्या गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील हे एकमेव रुग्णालय असून आजपासून या क्लिनिकल ट्रायल सुरुवात झाली आहे. या लसीचे प्रि-क्लिनिकल ट्रायल न्यूझीलँडमध्ये माकड, उंदीर, ससे यांच्यावर करण्यात आली आहे. आवश्यक त्या चारही निकषात (सुरक्षितता, प्रतिक्रिया, सहनशीलता आणि रोगप्रतिकारक्षमता ) ही लस 100 टक्के यशस्वी ठरली आहे. 

Covaxin ही लस प्रामुख्याने "होल विरीयॉन इनऍक्टीवेटेड वॅक्सीन" असून त्यात मृत कोरोना व्हायरसचा वापर करून त्याची पॅथोजेनिसीटी - रोग निर्माण करण्याची शक्ती नष्ट केली आहे. त्याच वेळेस त्याची इम्युनोजेनिसीटी - शरीरात अँटीबॉडीज तयार करून रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्याची शक्ती कायम ठेवली आहे. 

जरी कोरोना व्हायरसचे वेगवेगळे स्ट्रेन्स जगात असले तरी त्यावरील लस तयार करताना त्यांच्या आरएनएचा वापर केला जात असल्याने एकच लस जगभर वापरले जाऊ शकणार आहे. त्यामुळे जगात सुरु असलेल्या वेगवेगळ्या संशोधनातून एक लस जरी अंतिम यशापर्यंत पोहोचली तरी संपूर्ण जगात त्याचा वापर सारख्याच पद्धतीने करणे शक्य होणार असल्याची माहिती गिल्लूरकर रुग्णालयाचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी दिली आहे. 


18 ते 55 वयोगटातील सुदृढ स्वयंसेवकाची निवड केली जाणार आहे. म्हणजे ज्यांना कोणताही आजार नाही अशा लोकांच्या तपासण्या केल्या जातील. त्या तपासण्या निगेटिव्ह आल्यानंतर ही लस टोचली जाईल. दोन टप्प्यांमध्ये ही लस दिली जाईल. संपूर्ण भारतात पहिल्या टप्प्यात 375 लोकांवर ही ट्रायल केली जाईल. त्यात जर यश आलं तर 750 लोकांवर ही प्रयोग केली जाईल. इच्छुक स्वयंसेवकांचे परिक्षण करुन तपासण्या केल्यानंतर अहवाल दिल्लीला पाठवले जातील. 'झिरो डे'ला त्यांना लस दिली जाईल. 2 तास निरीक्षण केल्यावर त्यांचा फॉलो-अप घेतला जाईल. आणि 14 दिवसांनी त्यांना पुन्हा बोलवलं जाईल. त्यानंतर, त्यांच्या शरीरात किती अॅन्टीबॉडीज तयार होतात हे पाहिलं जाईल आणि पुन्हा 28 दिवसांनी पुन्हा त्यांना बोलावलं जाईल. 42, 104, 194 व्या दिवशी बोलावण्यात येईल आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कशी टिकते ते बघितलं जाईल. त्यामुळे या प्रक्रियेला फार वेळ लागणार आहे. 

- डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर, संचालक, गिल्लूरकर मल्टी स्पेशालीटी रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT