महाराष्ट्र बातम्या

मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्‍यता;पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण

सकाळवृत्तसेवा

पुणे - मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी (ता. 1) तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण असेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. 

उत्तर भारतातून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात थंडी वाढली. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, नगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नव वर्षाला जोडून आलेल्या "वीक एंड'ला मध्य महाराष्ट्रात फिरताना अचानक दाटून आलेल्या ढगांचे भान तुमच्या नियोजनात नक्की असू द्या. कारण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्यातर्फे वर्तविली आहे. 

का दाटले ढग? 
दक्षिण गुजरात, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पूर्व राजस्थान आणि उत्तर गुजरात येथे वाऱ्याची चक्राकार वाऱ्याची स्थितीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. 

पुण्यातून थंडी पळाली 
पुण्यात 22 डिसेंबरला 8.1 अंश सेल्सिअसपर्यंत उतरलेला किमान तापमानाचा पारा गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 13.1 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला. सरासरीपेक्षा 2.5 अंश सेल्सिअसने किमान तापमान वाढल्याचे निरीक्षण पुणे वेधशाळेतर्फे नोंदविण्यात आले. शहरात शुक्रवारी (ता. 1) आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. त्यामुळे शहरातील थंडीने काढता पाय घेतला. पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमानाचा पारा 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असाही खात्यातर्फे सांगण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT