Uddhav Thackeray - K. Chandrashekar Rao Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

"2024 साठीचा दिल्लीचा रस्ता महाराष्ट्रातून जाईल"

चंद्रशेखर राव यांच्या भेटीनंतर शिवसनेनं या विषयावर आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

सुधीर काकडे

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधीपक्षांत मोठ्या प्रमाणात वादंग सुरू आहे. भाजप (BJP) नेत्यांकडून वारंवार ईडी, सीबीआयच्या (ED, CBI) धमक्या येत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केला आहे. तर भाजपकडून देखील सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. आरोप प्रत्यारोपांची ही मालिका सुरू असतानाच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Roa) यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि शरद पवार यांची भेट घेतली. फक्त राज्यातच नव्हे तर देशात या विषयाची चर्चा झाली. सध्या देशात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीमध्ये परिवर्तनाची आवश्यकता असून, त्यासाठी बिगर भाजपशासित राज्यांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचा विचार राव यांनी मांडला. याच विषयावर शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये (Saamana) भाष्य करण्यात आलं आहे.

सामनामध्ये या विषयावरून केंद्रावर पुन्हा एकदा टीका करण्यात आली असून, 2024 नंतर देशात बदल होईल असं म्हटलं आहे. "ज्या राज्यांनी भाजपास मतदान केले नाही त्यांचा सूड घेणे म्हणजे हिंदुत्व नव्हे! पण बदला, सूड घेणे म्हणजे हिंदुत्व, रोज निवडणूक प्रचारात जोरात खोटे बोलणे म्हणजे हिंदुत्व असा प्रकार देशात सुरू झाला आहे. समाजवादी पार्टीची निशाणी सायकल. अतिरेकी सायकलवर बॉम्ब ठेवून स्फोट घडवतात म्हणून अखिलेश यादव यांना मत देऊ नका, असले पांचट विनोद करणे म्हणजे हिंदुत्व, असा भ्रम निर्माण करणाऱ्यांना 2024 सालात देशातील सत्तेवरून दूर करायलाच हवे. दिल्लीचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते. मात्र 2024 साठीचा दिल्लीचा रस्ता महाराष्ट्रातून जाईल, हे नक्की. ऐक्याची वज्रमूठ निर्माण झाली तर काहीच अशक्य नाही. तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव यांच्या मुंबई भेटीचा हाच अर्थ आहे." असं सामनामध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT