sule.jpg
sule.jpg 
महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंनी मान्य केले त्यांच्या पक्षात घाण : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ (जळगाव) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळ येथे पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षांवर कडा प्रहार केला. याच वेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील निशाणा साधला.   

भाजपामध्ये सध्या मेगाभरती जोरात सुरु आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांसह स्थानिक पदाधिकारीही भाजपाचा झेंडा हाती घेत आहेत. एकेकाळी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच भाजपा पक्षात घेत असल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जाते. तोच धागा पकडत,  खासदार सुळे यांनी मार्मिक टिप्पणी केली होती. 'भाजपकडे अशी कोणती वॉशिंग पावडर आहे ज्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे भ्रष्ट लोक तिकडे गेल्यावर स्वच्छ होतात?', असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी केला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी आज जशास तसं प्रत्युत्तर दिलं.

'आम्ही कुठलीही वॉशिंग पावडर वापरत नाही. आमच्याकडे विकासाचं डॅशिंग रसायन आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच अनेक पक्षांचे लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. विरोधी पक्षांवर जनतेचा सोडा, त्यांच्या लोकांचाच विश्वास राहिलेला नाही', असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

भाजपामधील मेगाभरतीची काळजी करण्याऐवजी स्वत:च्या पक्षातील मेगागळतीची चिंता करावी, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. तसेच ते म्हणाले की, त्या असे बोलत आहेत याचा अर्थ त्यांच्या पक्षात भ्रष्टाचाराची घाण झाली आहे, हे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे मी त्यांचे एकप्रकारे आभारच मानतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT