Ekanath Shinde and Anand Dighe  Sakal
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde:"माझं उध्वस्त झालेलं कुटुंब दिघे साहेबांनी सावरलं..." मुख्यमंत्री शिंदेनी व्यक्त केल्या भावना

Dharmaveer Anand Dighe Cancer Hospital:ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे कॅंसर रुग्णालयाचे भुमीपुजन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या.

सकाळ डिजिटल टीम

Eknath Shinde about Anand Dighe:धर्मवीर आनंद दिघे कॅंसर रुग्णालयाच्या भुमीपुजनाचा कार्यक्रम ठाण्यात पार पडला. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हातून हा भुमीपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.

भुमीपुजनाच्या वेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि दिघे साहेबांनी आपले कुटुंब सावरल्याच्या भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने कॅंसर रुग्णालय सुरु करणं, हे त्यांचं जिवंत स्मारक ठरेल, असा विश्वास त्यांनी दर्शवला.

ठाणे येथे पार पडलेल्या धर्मवीर आनंद दिघे कॅंसर रुग्णालयाच्या भुमीपुजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एकनाथ शिंदे म्हणाले की, "दिघे साहेबांनी आयुष्यभर काम केलं, आम्ही समोरून पाहिलं. ज्यांचं आयुष्य उदध्वस्त होणार होत त्यांना वाचवलं सावरलं. माझ देखील उदध्वस्त झालेल कुटुंब दिघे साहेबांनी सावरलं आहे."

यापुढे कॅंसर रुग्णालयाबद्दल एकनाथ शिंदे म्हणाले की, "या हाँस्पिटलच्या नावात आनंद आहे. ज्यांनी आयुष्याभर दुसर्यांच्या आनंदात आनंद शोधला. दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद दिला. त्यांच नाव ह्या हॉस्पिटलला दिल जात आहे. यापेक्षा आनंदाचा क्षण काय.? दिघे साहेबांच हे जिवंत स्मारक ठरेल."

कॅंसरसारख्या गंभीर आजाराबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "आज कँसर या रोगाचे प्रमाण वाढत आहे आणि म्हणून हॉस्पिटलची गरज आहे. नागपूर मध्ये पण एक हास्पिटल होत आहे, आज इकडे होत आहे याचा आनंद आहे."

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, "कॅसरच्या पेशंट मध्ये वाढ झाली. २०३५ पर्यंत पेशंट वाढतील अशी भीती आहे. कँसर हा व्यक्तीला होतो पण त्रास हा परिवाराला होतो. देशाच्या श्रमशक्तीवर देखील याचा परिणाम होतो." यापुढे ते म्हणाले की,"टाटा कँन्सर हास्पिटल वेळोवेळी मदत करते. आस्थेचं मंदिर आणि मानवतेचं मंदिर बाजुबाजूला होता आहे. दोन गोष्टी एकत्र आल्या तर इकडे आलेला प्रत्येक रुग्ण हा बरा होऊनच जाईल"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे अपडेट्स! केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी काय महत्त्वाचं?

Vishwajeet Kadam Warning to Government : सांगलीला पाणी द्या! "कोणी आडवं आलं तर गाठ माझ्याशी!"; विश्वजीत कदमांचा मंत्री शंभूराज देसाईंना थेट इशारा!

टोरंट प्रकल्पाविरोधात शिवसेनेचा एल्गार! कर्जतच्या जंगलातील वृक्षतोडीवरून आक्रमक भूमिका; सत्ताधाऱ्यांना घेरले

SHUKRA UDAY 2026 ASTRO PREDICTIONS: नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार? शुक्राच्या उदयाने धनलाभासह करिअरमध्येही येणार प्रगतीचे योग!

Maharashtra Live News: बंद कार्डधारकाचा माल पूर्ववत करण्यासाठी काँग्रेसचे धरणे

SCROLL FOR NEXT