Maratha Community Reservation Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : मराठा समाजानं धीर धरावा, महायुती सरकार कायद्यात टिकणारं आरक्षण देईल; CM शिंदेंचं मोठं आश्वासन

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार काम करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मराठा समाजाला कायद्यात टिकणारे आरक्षण महायुती सरकार देईल. दोन दिवसांत मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Community Reservation) देण्यासाठी सरकार सकारात्मक असून, याच मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी समजुतीची भूमिका घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.

कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठावर जनावरांसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या वंधत्व निवारण केंद्राचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते रात्री झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार काम करत आहे. न्यायालयात टिकेल असे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कोणत्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण देण्यात येईल. त्यामुळे जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी सरकारची ही भूमिका समजून घ्यावी. त्यांच्या प्रकृतीची चिंता सरकारला आहे.’

ते म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्थापन केलेली समिती योग्य काम करत आहे. त्यामुळे मराठा समाजाने आक्रमक आंदोलन करू नयेत. समाजातील तरुणांनी आत्महत्यासारखे पाऊल उचलू नये. मागच्या सरकारमुळे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. ज्या त्रुटीवर आरक्षण रद्द झाले, त्याच त्रुटीवर सरकार काम करत आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सरकारने क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी घेण्यास न्यायालयाने संमती दाखवली आहे.’

मराठा समाजाने धीर आणि धैर्य ठेवले पाहिजे. मराठा समाजाला कायद्यात टिकणारे आरक्षण महायुती सरकार देईल. दोन दिवसांत मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यात विविध योजनांचा लाभ मराठा समाजाला देण्यासाठी निर्णय होईल. त्यावर राज्य सरकार युद्धपातळीवर काम करत असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. यावेळी खासदार प्रा. संजय मंडलिक, अदृश काडसिद्धेश्‍वर महाराज आदी उपस्थित होते.

‘त्या’ व्हिडिओवर भाष्य करण्यास नकार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन’ असा व्हिडिओ शुक्रवारी (ता. २७) समाज माध्यमांवर प्रसारित झाला होता. त्यावर भाष्य करण्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी नकार दिला. सीमा भागात एक नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ दिन कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून लोक जातील, अशी माहिती त्यांनी एका प्रश्‍नावर दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cab Rules: कॅब ॲग्रीगेटर धोरणात मोठा बदल! कॅब राईड रद्द करणे चालकांना महागात पडणार; सरकार आता 'इतका' दंड वसूल करणार

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा धडाका पाहायला व्हा सज्ज... टीम इंडियाने टॉस जिंकला, Playing XI मध्ये एकाचे पदार्पण, कोण आहे Ashok Sharma?

Mumbai Police: 'खिशात पावडर टाकून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करेन', मुलांना धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन; गृह विभागाचा दणका

Latest Marathi Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला

'तिला कॅन्सर झालाय आता ती लवकरच...' सविता मालपेकरांचं टक्कल पाहून पसरलेली अफवा, मांजरेकराकडे रडत जात म्हणालेल्या...

SCROLL FOR NEXT