Eknath Shinde and Manoj Jarange Patil  esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : मनोज जरांगेंची मागणी असली, तरी मराठ्यांना OBC तून सरसकट आरक्षण मिळणार नाही; CM शिंदेंचं मोठं विधान

मराठा समजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्याचा कुठलाही विचार शासनाच्या मनात नाही.

सकाळ डिजिटल टीम

मनोज जरांगे यांची मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी असली तरी ते शक्य नाही.

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला ओबीसी (OBC) प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यास ‘ओबीसीं’चा विरोध आहे. त्यामुळे स्वतंत्र आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून, न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रविवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनानिमित्त (Marathwada Mukti Sangram) रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मृती स्तंभाजवळ ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर सुभेदारी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, इतर समाजाच्या आरक्षणाला कुठलाही हानी न पोचवता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे ओबीसी समाजाची दिशाभूल होता कामा नये.

मनोज जरांगे यांची मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी असली तरी ते शक्य नाही. ज्यांच्याकडे पूर्वी ‘कुणबी’चे रेकॉर्ड होते, पण त्याच्या नोंदी बदलल्या असतील तर सर्वे करून अशा मराठा समाजाला ओबीसीचा लाभ मिळेल, त्यासाठी ओबीसींचा आक्षेपही नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मराठा समजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्याचा कुठलाही विचार राज्य शासनाच्या मनात नाही. न्यायालयातून रद्द झालेले आरक्षण मराठा समाजाला पुन्हा मिळवून देण्यासाठी शासनातर्फे युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पटोलेंना कोणी गंभीर घेत नाही

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी (ता. १६) बोलताना मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाला बसविले आणि गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांवर सौम्य लाठीहल्ला करण्याचे आदेश दिले, असा आरोप केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पटोले यांना कोणी गंभीर घेत नाही, असा टोला लगावला.

काही तरी बोलून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी स्वतःच्या छातीवर हात ठेऊन सांगावे की, मी असा माणूस आहे का? माझ्या पोटात एक अन् ओठात एक असा स्वभाव नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लाठीमाराच्या घटनेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे, मी देखील दिलगिरी व्यक्त केली आहे. संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

आरक्षणावरून उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा

मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकावे, यासाठी ज्यांनी काहीच भूमिका घेतली नाही, आज ते आरक्षणाच्या आडून राजकारण करून टीका करत आहेत, असा निशाणा एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Uruli Kanchan Fraud News : प्लॉट विकत देतो म्हणून बुकिंग पोटी ५ लाख घेतले, खरेदीखत न करता फसवणुक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावे घरकूल घोटाळा, जलील यांचा आरोप

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

SCROLL FOR NEXT