Cabinet Expansion Esakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansion: मुहूर्त ठरला ! खातेवाटप आज पण मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर

राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन जवळपास १० दिवसांचा काळ उलटला. मात्र, अद्यापही नवीन सरकारच्या खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. मंत्रीपदावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून रस्सीखेच सुरू आहे. अशातच खातेवाटप आणि राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.(Latest Marathi News)

पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता मावळली आहे. सगळ्यात पक्षातील नेते विस्ताराकडे लक्ष लावून बसले आहेत यावेळी पण आमदार पदरी नाराजा येण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे रखडलेले खाते वाटप अधिवेशनाआधी मार्गी लागण्याची शक्यता आहे. यासंबधीचे वृत्त 'साम टिव्ही' सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. (Marathi Tajya Batmya)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी काल बुधवारी (12 जुलै) रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याची माहीती आहे.(Latest Marathi News)

या चर्चानंतर राज्याचं अर्थखातं राष्ट्रवादीकडे येईल अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तर खाते वाटपवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर आता दोन गट निर्माण झाले आहेत तर याबाबतची न्यायालयीन लढाई राष्ट्रवादीला लढावी लागणार आहे, यासंबधी चर्चा अमित शाह यांच्या बैठकीत झाल्याची माहिती आहे.  (Marathi Tajya Batmya)

तर राज्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शपथ घेतल्यापासून त्यांना कोणती खाती मिळणार याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अर्थखात मिळण्याबाबत राष्ट्रवादी आग्रही असल्याची माहिती आहे. अजित पवार आणि अमित शाह यांच्या बैठकीत अजित पवार यांनी याबाबत चर्चा केली असून भाजप राष्ट्रवादीला अर्थखात देण्यास तयार आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचा उत्तरफटका! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT