CM Eknath Shinde with Devendra Fadnavis  esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्रीही दिल्लीला रवाना; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट...

संतोष कानडे

मुंबईः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी दिल्लीकडे रवाना झाले होते. आता सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले आहेत.

राज्यामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार कधी होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शिंदे गटातीलल काही नेते जाहीरपणे नाराजी बोलून दाखवतात. मात्र सरकार विस्तार करण्यास चालढकल करत असल्याचं दिसून आलं.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सांगितलं जात होतं. मात्र कोर्टाचा निकाल येऊन एक महिना उलटला आहे. तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. आज मात्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले आहेत.

दिल्लीमध्ये दोन्ही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या बैठकीमध्ये रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच राज्यातील औद्योगिक प्रकल्पांसंदर्भात या भेटीत चर्चा होईल, असंही मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येतंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी मुंबईहून दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरहून दिल्लीला रवाना झाले. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच मोठी अपडेट येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT