Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: ज्येष्ठांसाठी आता मोफत देवदर्शन! मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू करणार; एकनाथ शिंदेंची घोषणा

CM Eknath Shinde in assembly session: विजयभाऊ. खोटे बोला पण रेटून बोला. तुम्हाला वाण नाही पण गुण लागला, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विजय वडेट्टीवारांवर निशाणा साधला.

कार्तिक पुजारी

मुंबई- विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच टोलावले. तसेच मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनेची घोषणा देखील केली. ते म्हणाले की, सरनाईक यांनी सभागृहात लक्षवेधी आणली होती. यात जे ज्येष्ठ नागरिक ज्यांना देवदर्शनासाठी जाण्याची इच्छा असते पण ते पैशांमुळे पूर्ण होत नाही. अशांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू करण्यात आली आहे. सर्व धर्मियांसाठी ही योजना असणार आहे. ज्या लोकांना तीर्थक्षेत्र दर्शन करायचे आहे. त्यांसाठी योजना आणण्याची मागणी होती.

हे सरकार सर्वसामान्य, गरीब लोकांचं आहे. अनेक नेते आपल्या मतदारसंघातील लोकांना देवदर्शनासाठी घेऊन जात असतात. त्यामुळेच आच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सरकारने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लवकर धोरण ठरवलं जाईल. त्यांचे ऑनलाईन अर्ज घेतले जातील. आणि बायरोटेशन, दरवर्षी एक अमूक आकडा ज्येष्ठांना देवदर्शनासाठी पाठवलं जाईल, असं शिंदेंनी म्हटलं.

यासंदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत.

आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल. त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने, ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सर्दस्य सर्वश्री राम कदम, प्रकाश सुर्वे, श्रीमती देवयानी फरांदे, मनिषा चौधरी आदी सदस्यांनी भाग घेतला.

महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. काल वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन केलं केले. दिंडीला २० हजार रुपये द्यायचा ‌निर्णय झाला. काही लोक म्हणाले लाडका भाऊ कुठे गेला? पण व्यावसायिक प्रशिक्षण घेणाऱ्यांना पदवीधरांना आम्ही १५ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे, असं शिंदे म्हणाले. लाडकी बहीण योजना आणली आहे. शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाचे निर्णय घेतला आहे, असंही शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे खोटं बोलत नाही. जे बोलतो ते आम्ही करतो. एक रुपयात पीक विमा दिला. केंद्रानं ६००० रुपये दिले, राज्यानं ६००० रुपये दिले. खोटं बोलू नका, विजयभाऊ. खोटे बोला पण रेटून बोला. तुम्हाला वाण नाही पण गुण लागला, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विजय वडेट्टीवारांवर निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने पुढे जातोय

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT