CM Eknath shinde on Kolhapur bandh Aurangzeb controversial status On social media  
महाराष्ट्र बातम्या

Kolhapur Bandh : गृहमंत्री जातीने परिस्थितीवर लक्ष ठेवून…; CM शिंदेंनी कोल्हापूरच्या जनतेला केलं 'हे' जाहीर आवाहन

रोहित कणसे

कोल्हापूर : सोशल मीडियावर अक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर कोल्हापुरात तणाव निर्माण झाला आहे. याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदी हाक दिली होती. त्यानंतर आज मोठ्या सख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. या पार्श्वभूमिवर सध्या शहरात प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. राज्य सरकार हे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणार सरकार आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यातं काम देखील गृह विभागाचं आहे. मी संबंधीत अधिकाऱ्यांशी वयक्तिक संपर्कात आहेत. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. कायदा हातात घेणाऱ्यांना पाठीशी घातलं जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

संबंधित अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे आणि परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जशी सरकारची आहे तशी सगळ्या नागरिकांच्या सहकार्याची देखील अपेक्षा आहे. कुठेही अनुचित प्रकार होणार नाही याची गृहविभाग घेत आहे आणि गृहमंत्री देखील दखील जातीने यावर लक्ष ठेवून आहेत असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर काल दुपारपासून कोल्हापूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये आज हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या होत्या. यामुळे शहरात तणावाची परिस्थीत निर्माण झाली होती.

यावेळी जमावाकडून अनेक दुकानांची, मालगाड्यांची तोडफोड करण्यात आलीये. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला तरी परिस्थिती नियंत्रणात येत नाहीये. यामुळं काही ठिकाणी पोलिसांनी अश्रूधुर कांड्या फोडल्या.

६ जणांना अटक

गृहविभागाकडून लवकरात लवकर कोल्हापुरात शांतता प्रस्थापित करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते. यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेत दोषी असणाऱ्या, ६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्याची माहिती देखील दिली आहे.तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल आणि कोल्हापुरातील परिस्थिति नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देखील केसरकरांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सरकारचे संसदेत मोठं स्पष्टीकरण

Delhi Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवार गटाच्या आठ खासदारांशी भेट; मतदारसंघ पुनर्रचनेच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा; राज्यात पावसाची शक्यता, पुढील ५ दिवसांचा अंदाज

Marathi News Live Updates: पुण्यातील कॅम्पमधील हॉटेलचे कुलूप तोडून दोन लाखांची रोकड लंपास

Rahul Gandhi: संसदेत येण्याचे धैर्य शहांमध्ये नाही: राहुल गांधी, विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसची सरकारवर टीका

SCROLL FOR NEXT