eknath shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

मराठ्यांची फसवणूक करायची नाही, पण फूल प्रुफ प्लॅन हवा; आरक्षणाबाबत गंभीर असल्याचं एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन

कार्तिक पुजारी

मुंबई- उच्चस्तरीय बैठक आज पार पडली. जालन्यातील उपोषणकर्ते मनोज जरंगे पाटील यांच्याशी संवाद साधला. जालन्यात जे काही झालं जो काही प्रकार झाला या बाबतीत मी मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोललो होतो. सरकार गांभीर्याने काम करत आहे. मराठा समाजाची या आधी जी काही आंदोलन झाली ती सर्व शिस्तबद्ध पद्धतीने झालीत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीनंतर म्हणाले.

मराठा समाजाची फसवणूक करायची नाही, प्लॅन फूल प्रूफ असावा यासाठी गांभीर्याने प्रयत्न केला आहे. आयोगालाही सूचना देण्यात आलेल्या आहेत. सरकार कुठेही मागे पडणार नाही. आरक्षण देण्यासाठी सरकार बांधिल आहे. मराठा समाज काही प्रमाणात पुढारलेला आहे. पण, मोठ्या प्रमाणात मागास आहे. समाज मागास असल्याचं सुप्रीम कोर्टासमोर सिद्ध करावा लागेल. आरक्षण टिकण्यासाठी फूल प्रूफ योजना हवी, असं शिदें म्हणाले.

मराठा समाज शिस्त प्रिय आहे. पण, काही लोक वातावरण चिघळवण्याचं काम करत आहेत. त्यांच्या पासून सावध रहा. जरंगे पाटील यांच्या जिवाची काळजी सगळ्यांनाच आहे. त्यांची तब्बेत बिघडली तेव्हा त्यांना रूग्णालयात भरती करण्यास पोलीस गेले होते, असं शिंदे यांनी सांगितलं. आंदोलनाच्या आडून या महाराष्ट्रात शांतता बिघडवण्याच काम किंवा जाती जातीत तणाव निर्माण करण्याच काम करत आहेत, त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे, असं ते म्हणाले.

जो प्रकार झाला त्याची आम्हांला खंत आहे. शासन गंभीर आहे आणि समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काम करतोय. जे आज त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे अस बोलत आहेत. तुम्ही त्या पदावर होतात तेव्हा तुमचे हात कोणी बांधले होते, असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.सरकार बदलल्या नंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यांच्या काळातच सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षण रद्द झालं, असं ते म्हणाले.

जे काही भाष्य अशोक चव्हाण यांनी केलं ते योग्य नाही. त्यावेळच्या सरकारने त्रूटी दुर केल्या नाहीत. आरक्षण कसं देता यावे या अनुषंगाने अभ्यास सुरू आहे. त्रुटी दुर कशा होतील यावर सरकार काम करत आहे. कोर्टाच्या निदर्शनास ज्या काही बाबी आणायच्या आहेत त्यावर सुद्धा काम सुरू आहे. राज्याचा प्रमुख म्हणून इच्छाशक्ती लागते. सरकार येताच अनेक योजना आणि निर्णय घेतले, अशी माहिती शिंदेंनी दिली.

आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते टिकलं पाहिजे. आम्हाला कोणाला फसवायचं नाही. आमची भूमिका देवेंद्र जी मुख्यमंत्री होते तेव्हाही होती आणि आजही आहे. त्याच्यावर काम आता सुरु आहे. आयोगाला सुचना केल्या आहेत. ज्या त्रुटी सुप्रीम कोर्टाने काढल्या आहेत त्यावर काम सुरु आहे. सरकार मागे पडणार नाही. मराठा समाजाला माजी विनंती आहे की त्यांनी संयम बाळगावं. सरकार पूर्णपणे प्रमाणिक पणे आरक्षण देण्याच्या बाजूने आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

चूका दुरूस्ती करण्यासाठी ईम्पेरीकल डेटा बनवला आहे. त्यासाठी टास्क फोर्स सूरू केल्या आहेत. दगडफेक करणारा मराठा समजाचा आंदोलक नसावा. दोषींवर कारवाई केली जाईल. याप्रकरणी पोलिस महासंचालकाच्या माध्यमातून चौकशी सुरु आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना याची चौकशी करतील. उप विभागीय अधिकारी निलंबित केले आहे, तसेच एसपीची जिल्हा बाहेर बदली केली , अशी माहिती त्यांनी दिली.

एक समिती गठीत केली आहे ते महिन्याभरात अहवाल सादर करेल. कुणबी समाजाच्या दाखल्याचा जो विषय आहे, महसूल विभागाचे सचिव त्यावर काम करत आहे. अहवाल येईल त्याप्रमाणे शासन कारवाई करेल. कुणबी दाखल्याचा जो विषय आहे त्यावर समिती गठीत केली आहे. जी मागणी आहे त्यावर सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT