Chief Minister Eknath Shinde Shiv Sena intra-party differences in beed political news  
महाराष्ट्र बातम्या

मनोज जरांगे यांच्या निस्वार्थीपणाची CM शिंदेंनी दिली ग्वाही पण केली ' ही' विनंती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंना मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कमिटीत येण्याची विनंती केली.

Manoj Bhalerao

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अंतरवली सराटी गावातील मनोज जरांगे हे बऱ्याच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. काही दिवसांपुर्वी जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यानंतर राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने शांततेची पवित्रा घेत, मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सकारात्मक पाऊल उचललं. नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याबद्दल महत्वाचं विधान केलंय. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंना मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कमिटीत येण्याची विनंती केली.

जरांगेबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मनोज जरांगे पाटील यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी आंदोलन केलेलं नाही. या मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी आंदोलन केलं. ही त्यांची भावना अत्यंत स्वच्छ आहे, स्पष्ट आहे. त्यामुळे सरकारने घेतलेली भूमिका देखील स्पष्ट आहे. असं थातूर मातूर वेळकाढूपणा करणारं हे सरकार नाही."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी शिंदे कमिटीचं गठण करण्यात आलं होतं. जरांगे यांनी या कमिटीमध्ये यावं अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्याचबरोबर मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत कसं टिकवता येईल. तयार करण्यात आलेली तज्ञांची कमिटी मराठा समाज मागास कसा हे सिद्ध करण्यासाठी चर्चा करेल. मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

यावेळी मुख्यमत्री म्हणाले की मराठा आरक्षणाबाबत जो निर्णय घेऊ तो कायद्याच्या चौकटीत टिकला पाहिजे. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. मराठा विद्यार्थ्यांना सारथी आणि इतर सुविधा मिळाल्या पाहिजे. ३७०० अतिरिक्त पदे निर्माण करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

'ही' मुस्लिम अभिनेत्री मन:शांतीसाठी वाचते हनुमान चालिसा, म्हणाली, 'मला गायत्री मंत्र खूप आवडतो, त्याने ऊर्जा जाणवते'

"माजोरडी उत्तरं..." हिंदी भाषा सक्तीच्या प्रश्नावर मराठी अभिनेत्याची पोस्ट; "अपेक्षा खरंच मोठी आहे का ?"

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

SCROLL FOR NEXT