uddhav thackeray and eknath shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : मी मुख्यमंत्री आहे, सगळ्यांची खबर ठेवतो; केजरीवाल-ठाकरे भेटीवरुन शिंदेंचं विधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः विरोधकांनी केलेल्या आरोपांना मी माझ्या कामातून उत्तर देईल, कुणाच्याही मालमत्तेवर आणि पैशांवर माझा डोळा नाही. आमच्यासाठी बाळासाहेबांचे विचार ही प्रॉपर्टी असल्याचं मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.

'एबीपी न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, माझा स्वभाव हा काम करण्याचा आहे. निवडणूक आयोगाने निर्णय दिला, त्याचं स्वागत करतो. न्याय व्यवस्था, निवडणूक आयोग ह्या स्वायत्त संस्था आहे. आपल्या बाजूने निर्णय लागला की या संस्था चांगल्या आणि आपल्या विरोधात निर्णय लागला की संस्था वाईट, असं काहीजण वागत आहेत.

आम्ही फक्त शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह घेतलं आहे. त्यांच्या संपत्तीवर आम्ही दावा केलेला नाही. त्यांना बाळासाहेबांचे विचार त्यागले त्यामुळे आम्ही पक्ष सोडवून आणून विचारांवर चालत आहोत. असं शिंदे म्हणाले.

काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 'मातोश्री' निवासस्थानी जात उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. उद्धव ठाकरे हे वाघाचा मुलगा आहेत, ते लढाई जिंकतील, असं केजरीवाल म्हणालेले.

त्यावर बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी मुख्यमंत्री आहे, सगळ्या गोष्टींची खबर ठेवतो. आम्ही त्यांना (उद्धव ठाकरेंना) जवळून पाहिलं आहे. त्यामुळे त्यांना आम्हीच खरं ओळखतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Maharashtra SET Exam 2026 : सेट परीक्षेच्या तारख्येत पुन्हा बदल! आता 27 ऐवजी 'या' दिवशी होणार परीक्षा, विद्यापीठाची नवीन घोषणा

SCROLL FOR NEXT