Ajit Pawar and Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

''मी घडाळ्याकडे बघतच नाही... इथून पुढे राष्ट्रवादीचा झेंडा...'' अजित पवारांसमोरच मुख्यमंत्री हे काय बोलले? Eknath Shinde

संतोष कानडे

मुंबईः परवा गडचिरोली येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.

आज धुळ्यात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी आपण घड्याळाकडे बघतच नाही रात्रंदिवस काम करतो, असं विधान केलं.

एकनाथ शिंदे बोलतांना म्हणाले की, शिवसेना आणि भाजपची आमची युती २५ वर्षांची आहे. आता शिवसेना-भाजपचे झेंडे लागलेले आहेत. परंतु लोकांना अंगवळणी पडायला वेळ लागतो. पुढच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचेही झेंडे लागतील.

ते पुढे म्हणाले की, आपलं सरकार हा विकासाचा त्रिशूळ आहे. जिकडे बघावं तिकडे आपल्या सरकारला पाठिंबा मिळत आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधक आरोप करीत आहेत. त्यांचा संघर्ष मोठा आहे. बाळासाहेबांचं स्वप्नही मोदी साहेब पूर्ण करीत आहेत. अयोध्येतलं राम मंदिर, कलम ३७० हटवणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं.

''आता महाराष्ट्रात अजितदादा विकासाला साथ देत सोबत आलेले आहेत. मी घडाळ्याकडे न बघता काम करतो. त्यामुळे राज्याला विकासाकडे नेण्याचं काम महायुती केल्याशिवाय राहणार नाही.'' मुख्यमंत्र्यांनी असं विधान केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शासन आपल्या दारी हा कार्यक्रम लोकाभिमुख होत असून त्याला प्रतिसाद मिळत आहे. परंतु विरोधकांना याचा त्रास होत आहे, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेंनी विदर्भापासून पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT