eknath shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena Case: CM शिंदेंची गटनेतेपदाची निवडही बेकायदेशीर; कोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचा मोठा दावा

रुपेश नामदास

गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर गुरूवारी संपली. राज्यपाल आणि शिंदे गटाकडून बहुतांश गोष्टी कशा चुकीच्या झाल्या असे निरीक्षण नोंदविताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर परिस्थिती पूर्ववत ठेवता आली असती, असे सांगून सोळा आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याचे नमूद केले.

मात्र कोर्टाने गुरूवारी दिलेल्या निर्णयात अजून एक मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. सुप्रिम कोर्टाने गुरूवारी दिलेल्या निर्णयात असे सांगण्यात आलं आहे की, २१ जून २०२२ रोजी उपअध्यक्षांसमोर दोन गट पडले असा कोणताही पुरावा नसल्याने एकनाथ शिंदे यांच्या जागेवर अजय चौधरी यांची गटनेते पदी निवड झाली त्यावर कोणतीही शंका घेण्यात आली नाही.

त्या ठरावावर उद्धव ठाकरे यांनी पक्ष अध्यक्ष म्हणून सही केली होती, तर प्रतोद आणि गटनेते निवडीचे सर्व अधिकार २०१९ साली ठाकरे यांच्याकडे देण्यात आले होते. यामुळे उपअध्यक्षांनी अजय चौधरी यांची एकनाथ शिंदे यांच्या जागी केलेली निवड वैध ठरते, म्हणजेच गटनेते म्हणून ठाकरे गटाचे अजय चौधरी यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांची केलेली गटनेते पदी निवड बेकायदेशीर ठरते अशी माहिती अनिल परब यांनी कोर्टाचा निर्णय वाचताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT