CM Shinde on KCR 
महाराष्ट्र बातम्या

CM Shinde on KCR: त्यांनी निवडणुका लढवल्या पाहिजेत... शिंदेंनी घेतली KCR यांची बाजू

Sandip Kapde

CM Shinde on KCR : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांनी आज (मंगळवार) महाराष्ट्रातील पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रार्थना केली. चंद्रशेखर राव दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी दौऱ्याला सुरुवात झाली आहे.

भारत राष्ट्र समितीचे नेते आणि त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी 600 वाहनांसह सोमवारी पंढरपूरला आले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केसीआर यांचे हे मोठे शक्तिप्रदर्शन मानल्या जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसीआर यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले,  निवडणुका लढवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. ज्यांना आवड आहे त्यांनी निवडणुका लढवल्या पाहिजेत. मात्र केसीआर यांनी आधी पक्ष सांभाळला पाहीजे. महाराष्ट्रात आम्ही समर्थ आहोत. तसेच देवाचे दर्शन जो पाहिजे तो घेईल यात राजकीय गोष्टी नाहीत.

केसीआर यांचा शिंदे सरकारला सवाल-

  • बीआरएस महाराष्ट्रात प्रवेशामुळे इतर पक्षात भीतीचं वातावरण आहे. महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाने विकास केला नाही.

  • बीआरएस ही शेतकऱ्यांची टीम आहे, कोणत्याही राजकीय पक्षाची टीम नाही

  • सोलापूर आणि औरंगाबादमध्ये ८ दिवसांपासून एकदा पाणी येते, मग विकास कसला झाला, असा प्रश्न केसीआर यांनी उपस्थित केला.

  • बीआरएस हा तेलंगणा आणि महाराष्ट्रापुरता मर्यादित पक्ष नाही

  • महाराष्ट्रात वीज कंपन्यांचे खासगीकरण का केले, तरी देखील शेतकऱ्यांनी वीज का मिळत नाही, असा सवाल देखील केसीआर यांनी उपस्थित केला.

  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी वीमा योजना का नाही, आम्ही शेतकऱ्यांनी विमा योजना दिली. महाराष्ट्रात शेतकरी एकत्र होत नाही तोपर्यंत काही बदलणार नाही. राजकीय पक्ष येतील आणि जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT