CM Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

...त्यासाठी अकलेची गरज नसते; CM ठाकरेंचा विरोधकांना टोला

कौतुक करण्यासाठी आपण काम करत नाही. कर्तव्य म्हणून आपण काम करतो - मुख्यमंत्री

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न पहाता लोकांसाठी काम केले तर लोक आपल्याशी गोड राहतील अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुंबई महापालिका कौतुकासाठी नाही तर कर्तव्य म्हणून काम करते. स्वत: काहीही न करता, महापालिका काय करते हा प्रश्न काहीजण नेहमी उपस्थित करतात. यावरून प्रश्न विचारणं सोपं असतं त्याला अक्कल लागत नाही असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. अजूनही कोरोनाचे संकट टळलेलं नाही. याकाळात मुंबई महापालिकेनं काम केलं आहे. याचं थेट न्यूयॉर्क आणि सर्वोच्च न्यायालयानं कौतुक केलं आहे. कौतुक करण्यासाठी आपण काम करत नाही. कर्तव्य म्हणून आपण काम करत असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे ते म्हणाले, कौतुक किती होईल याची मला चिंता नाही. आताच्या कार्यक्रमाची किती मोठी बातमी येईल हे माहीत नाही. उद्याच्या कौतुकाचीही अपेक्षा नाही. मुंबई महापालिकेन देशातील एक नंबरची महापालिका म्हणून जनतेला ८० टक्क्यांहून अधिक सुविधा घरबसल्या दिल्या आहेत. मात्र जरा कुठं काय खुट्टं झालं तर महापालिकेवर खापर फोडलं जातं. नगरसेवक, महापौर, आयुक्त काय करतात? यावर सवाल उपस्थित होतात. हे सगळं ठीक आहे. पण यावर तुम्ही काय करता हे सांग? स्वत: काहीही न करता फक्त प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज लागत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

आजचे पंचांग 06 ऑक्टोबर 2026! इंदिरा एकादशी, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि आजचे चंद्रबळ जाणून घ्या

Marathi News Live Updates: आसाममध्ये पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का; ४.५ रिश्टर तीव्रतेच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

SCROLL FOR NEXT