latadidi esakal
महाराष्ट्र बातम्या

आमच्यावरील मातृतुल्य आशीर्वाद हरपला; मुख्यमंत्री ठाकरे भावूक

सुरेल स्वरांनी, गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने लतादीदी अजरामर राहतील - CM ठाकरे

सकाळ डिजिटल टीम

सुरेल स्वरांनी, गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने लतादीदी अजरामर राहतील - CM ठाकरे

मुंबई - गानकोकिळा लता मंगेशकर (Legendary Singer Lata Mangeshkar) यांचे वार्धक्यानं निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने आज संगीत, कला अशा सर्व क्षेत्रांवर शोककळा पसरली आहे. राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून लता दीदींना श्रद्धांजली वाहिली जात आहे. लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला असून एक महान पर्व संपले आहे. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर असून त्या विश्व व्यापून राहिल्या आहेत. आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, आपल्या लाडक्या लतादिदी आज आपल्यात नाहीत, हे सून्न करणारं आहे. पण सुरेल स्वरांनी, गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर राहतील. आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग, क्षण लतादिदींनी सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. लतादिदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं? अशा शब्दांत ते भावुक झाले आहेत.

ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध

दरम्यान, ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. उत्तम कॅमेरे, वेगवेगळ्या लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. मात्र आता त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा तो स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव कायम जाणवत राहील, असेही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

Pimpri Raja Accident: पिंप्री राजा गणेश मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, सात जखमी, गावावर शोककळा

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

SCROLL FOR NEXT