congress balasaheb thorat on meetingwith bjp devendra fadanvis offer about rajyasabha election 2022 
महाराष्ट्र बातम्या

'आम्ही प्रयत्न केला...'; बैठक संपताच काँग्रसकडून पहिली प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. याच संदर्भात आज मविआ च्या प्रमुख नेत्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या नंतर कॉंग्रेसचे नेत बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राज्यसभेच्या सहा जगांसाठी निवडणूक दहा तारखेला होणार हे स्पष्ट झालं, मतांची वर्गवारी केली तर भाजपला दोन जागा मिळत होत्या, काँग्रेस राष्ट्रवादी एक जागा होत होत्या, एक जागेसाठी ही निवडणूक होत आहे. आमचे मित्र पक्ष अपक्ष पहीले तर चौथी जागा आमची निवडून येईल असे कॉंग्रेस नेत बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले आहेत

महाराष्ट्रात चर्चा करायची प्रथा आहे, मार्ग निघाला तर बाकीच्या गोष्टी थांबतात, आम्ही प्रयत्न केला, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना भेटलो, त्यांनी विनंती मान्य केली असती तर ठीक असते, निवडणूक सुरू झाली की अनेक प्रश्न पुढे येतात. पक्ष वेगळे असेल तरी एकत्र निर्णय घेतला पाहिजे, हे प्रयत्न आधी झाले आहेत, असे बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.

आमची मतांचा कोटा पाहाता चौथी जागा महाविकास आघाडीची निवडून येईल, काही अपक्ष असले तरी बहुसंख्य अपक्ष आमच्या बरोबर आहेत. अपक्ष साथ आम्हाला दिली, तरी आम्ही काळजी घेतली आहे, असे ते म्हणाले. मला खात्री आहे, मताचा आकडा चौथा उमेदवार निवडून येईल इतका आहे. पुढाकार आम्ही घेतला संवाद करण्यात, तो टिकवून ठेवण्याची गरज दोन्ही बाजूंची असते असे थोरात यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Bans China Cars : इस्त्रायलमध्ये 'मेड इन चायना' वाहनांवर बंदी, ७०० कार जप्त; सरकारचा 'या' कारणामुळे मोठा निर्णय

अग्रलेख : चला उभारा शुभ्र शिडे ती..

जुबेर हंगरगेकरला आज पुन्हा न्यायालयात नेले जाणार! ‘वाहदते मुस्लिम- ए- हिंद’च्या सोलापुरातील पदाधिकाऱ्यास ‘ATS’ची नोटीस, कुंभारीजवळील शाळेतील कार्यक्रमाचे तेच होते आयोजक

फास्ट फूड ते फॅटी लिव्हर

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT