Congress-shivsena 
महाराष्ट्र बातम्या

दिल्लीत झालेल्या बैठकीचे काँग्रेसने दिले नाही शिवसेनेला आमंत्रण

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्यात महाविकास आघाडीसाठी काँग्रेस आणि शिवसेनेने हातमिळवणी केली असली, तरी शिवसेनेच्या धर्मनिरपेक्ष भूमिकांविषयी काँग्रेसला अद्यापही पुरेशी खात्री वाटत नाही. काँग्रेसने सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्यासाठी आमंत्रित केले असले, तरी शिवसेनेच्या भूमिकेविषयी काँग्रेसला अंदाज येत नसल्याने विरोधकांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीपासून शिवसेनेला दूर ठेवण्यात आले. शिवसेनेनेही याविषयी सावध भूमिका घेत या बैठकीबाबत गैरसमज झाल्याची सारवासारव शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन करण्यापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून शिवसेना बाहेर पडली. केंद्र सरकारमध्ये असलेल्या कॅबिनेट मंत्रिपदाचाही शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला. सीएएचे विधेयक लोकसभेत मंजूर करताना शिवसेनेने पाठिंबा दिला, तर राज्यसभेत मतदानात भाग न घेता सभात्याग केला. शिवाय, काँग्रेसप्रणीत सर्व राज्ये, पश्‍चिम बंगाल आदी राज्यांनी सीएए कायद्याची त्यांच्या राज्यात अंमलबजावणी करणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, महाराष्ट्राने अद्याप याबाबत ठोस भूमिका घेतली नसल्यानेही शिवसेनेच्या भूमिकेविषयी काँग्रेसला विश्‍वास वाटत नसल्यानेही शिवसेनेला या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले आहे. केंद्रात विरोधी पक्षात शिवसेना असली, तरी अद्याप शिवसेनेला संयुक्‍त पुरोगामी आघाडीत घेण्याविषयी आघाडीमध्ये एकमत झालेले नाही. 

याबाबत शिवसेनेेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, राज्यात हा कायदा जबरदस्तीने लादला जाणार नाही, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली आहे. या सीएए कायद्याबाबत काही त्रुटी आहेत असे शिवसेनेला वाटते. त्या दूर व्हायला पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी करीत शिवसेनेची भूमिका स्पष्ट असल्याचे 
सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे सहा दरवाजे ६ फूटांनी उचलले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; ३३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

1 August 2026 Horoscope : मकर अन् मिथुन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली! पाहा 12 ही राशींचे आजचे भविष्य

Amit Shah Pune : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अमित शाहंचा फोटो; 'भारताचा चाणक्य' म्हणून वादग्रस्त बॅनर?; काँग्रेसने विरोध करताच पोस्टर गायब

Latest Marathi News Live Update : राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात नसतो : अमित ठाकरे

दिल्लीच्या गाजलेल्या CJP आंदोलनावर येणार सिनेमा; पडद्यामागचं 'सत्य' उलगडणार?

SCROLL FOR NEXT