Vishwajeet Kadam  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Vishwajeet Kadam : काठावरच्या विश्वजीत कदमांना थोरांताचा सल्ला; म्हणाले...

गेल्या काही दिवसांपासून विश्वजीत कदम भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Balasaheb Thorat On Veshwajeet Kadam : गेल्या काही दिवसांपासून विश्वजीत कदम भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे. या सर्व चर्चांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विश्वजीत कदम यांचे कौतुक करत वडिलकीचा सल्ला दिला आहे. ते पलूस तालुक्यातील अंकलखोपमधील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या शताब्दी सोहळ्यातील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी स्वतः विश्वजीत कदमही उपस्थित होते.

काँग्रेसचा विचार, नेतृत्व पुढे घेऊन नेण्याची जबाबदारी आता विश्वजितवर आहे. विश्वजित कदम यांचा भविष्यकाळ काँग्रेसमध्ये घडेल. तो दुसरीकडे कोठेही घडणार नसल्याचे ते म्हणाले. पतंगराव कदम गेल्यानंतर विश्वजीत कदमांना सांभाळून घ्यावे लागेल असे वाटत होते. मात्र, आता विश्वजीतच सगळ्यांना सांभाळत असल्याचे म्हणत गडी एकदम बिलंदर असून, काँग्रेसचा विचार, नेतृत्व पुढे घेऊन नेण्याची जबाबदारी आता विश्वजीतवर असल्याचे थोरात म्हणाले.

यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर भाष्य केले. अशोक चव्हाण गणपती निमित्त एका मित्राकडे गेले होते. त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. मात्र, वृत्तवाहिन्यांनी त्याला वेगळा अँगल दिला. अशा प्रकारच्या बातम्यांमुळे एखाद्याचा कार्यक्रम होऊन जातो असा मिश्किल टोलादेखील थोरातांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT