Congress-Manish-Tewari
Congress-Manish-Tewari 
महाराष्ट्र

काँग्रेस नेता म्हणतो, 'सावरकर नाही, नथुरामलाच द्या भारतरत्न'

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : भाजपने आपल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपवर चोहोकडून टीकेचा भडीमार सुरू झाला. आता एका काँग्रेस नेत्यानेही भाजपवर सडकून टीका केली आहे.

काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी 'सावरकर यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप होता. तर, नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची हत्या केली होती. यंदा महात्मा गांधींची 150 वी जयंती देशभर साजरी केली जात असताना भाजप सरकार त्यांच्या हत्याऱ्यांना भारतरत्न देण्याची भाषा करत आहे. जर भारतरत्न द्यायचा आहे, तर मग सावरकरांऐवजी नथुराम गोडसेलाच हा पुरस्कार द्या,' असे तिवारींनी म्हटले आहे. 

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.15) भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. आणि यामध्ये हिंदुत्वाचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि 19 व्या शतकातील ज्येष्ठ समाजसुधारक ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे म्हटले आहे. 

बुधवारी (ता.16) काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनीही सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला होता. अल्वी म्हणाले की, "सावरकरांचा इतिहास सर्वजण जाणतात. त्यांच्यावर गांधीच्या हत्येचे आरोप होते. मात्र, सबळ पुराव्यांअभावी त्यांनी सोडून देण्यात आले होते. कदाचित, भाजपकडे असणाऱ्या भारतरत्न देण्याच्या यादीमध्ये सावरकरांनंतर नथुराम गोडसेचेही नाव असू शकते,'' असे अल्वींनी म्हटले होते.  

दुसरीकडे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली होती. प्रसाद म्हणाले की, ''राष्ट्रभक्तांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यास काँग्रेस विरोध करत आहे. ते केवळ काँग्रेस परिवारातील सदस्यांनाच हा पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्न करत असतात.'' 

''काँग्रेसने देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि देशाचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही भारतरत्न देण्यास विरोध केला होता. त्यानंतर जेव्हा नरसिंह राव पंतप्रधान झाले, तेव्हा या दोन्ही नेत्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पण, सावरकरांना भारतरत्न देण्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेस का चिंतीत झाली आहे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT