Sharad Pawar-Nana Patole
Sharad Pawar-Nana Patole Sakal
महाराष्ट्र

Nana Patole: 'जे राहतील त्यांना घेऊन लढू', शरद पवारांच्या त्या वक्तव्यावर नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी २०२४च्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढण्याच्या मुद्द्यावरुन सूचक वक्तव्य केलं आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. तर आता पवारांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra politics letest update)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, 'काँग्रेसची भूमीका स्पष्ट आहे. जो पक्ष भाजप विरोधात आहे त्यांना सोबत घेऊन आम्ही लढणार आहे. जे आमच्यासोबत आहे त्यांचे विचार वेगळे असू शकतात. आज देशात संविधान धोक्यात आलं आहे, महागाई आणि गरिबीमुळे देश संकटात आहे. त्यामुळे जे आमच्यासोबत आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन भाजपविरोधात लढणार आहे', असंही नाना पटोले म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले होते?

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या कामगिनेत्यांनी घेतला आहे. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. एकत्र लढण्याची इच्छा फक्त पुरेशी नसते. असं वक्तव्य पवार यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पवारांनी टाकलेली गुगली सर्वांना संभ्रमात पाडत आहे. अशातच त्यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

अमरावतीत झालेल्या एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी २०२४ मधील निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगणार, एकत्र लढण्याची इच्छा आहे. मात्र केवळ इच्छा पुरेशी नसते, त्यामुळे एकत्र लढणार की नाही हे आताच सांगता येणार नाही असे शरद पवार म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाषणाची सुरुवात नेहरुंच्या नावाने केली अन् मोदी तिसऱ्यांचा पंतप्रधान झाल्याचं राज ठाकरेंनी केलं जाहीर

गौतम अदानींनी तिच्यासाठी केला मदतीचा हात पुढे; जाणून घ्या काय आहे 'लवली'ची व्यथा!

Swati Maliwal: स्वाती मालिवाल भाजपच्या षडयंत्राचा भाग; 'आप'कडून घणाघाती आरोप

Mumbai Rally: पुतिन जसं विरोधकांना संपवतात, तसाच प्रयत्न मोदींकडून सुरु; अरविंद केजरीवाल यांचा घणाघात

Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल!

SCROLL FOR NEXT