Rahul Gandhi  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Bharat Jodo : व्यायाम, क्रिकेट, ध्वजवंदन, असं आहे यात्रेदरम्यान राहुल गांधी यांचं टाईमटेबल

कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रेला ग्रामीण भागात उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रेला ग्रामीण भागात उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नफरत तोडो, भारत जोडोच्या घोषणा देत या यात्रेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे शाळकरी मुलेही उत्साहाने पुढे येत सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभागी होत आहेत. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रेवर विरोधकांकडून टीकाही केली जात आहे.

हेही वाचा : हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

कन्याकुमारीपासून ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली असून महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पाच दिवसांनी आता शुक्रवारी हिंगोली जिल्ह्यात यात्रेने प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे नेते, पदाधिकारी, साहित्यिक, वकीलांपासून ते सर्वसामान्य नागरिक यात्रेत सहभागी झाले होते. जिल्ह्यात देगलूरपासून यात्रेचे मोठ्या उत्साहात आणि हजारोंच्या संख्येने स्वागत करण्यात आले. कॉँग्रेससह इतर पक्षांचे तसेच संघटनांचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.

अशी आहे राहुल गांधी यांची दिनचर्या

- सकाळी पाच वाजता राहुल झोपेतून उठतात. हलका व्यायाम करतात. एखाद्या दिवशी क्रिकेट, फुटबॉल किंवा इतर खेळ खेळतात. त्यानंतर चहा, नास्ता करतात

- सकाळी कार्यकर्ते, राहुल स्वतःच साफसफाई करून निवास ठिकाण सोडतात.

- सहा वाजता त्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन होते. त्यानंतर ज्या ठिकाणी रात्रीचा मुक्काम असतो त्याच परिसरातून सकाळच्या टप्प्यातील यात्रेला सहा वाजताच्या सुमारास सुरुवात होते.

- राहुल यांच्या सोबत कन्याकुमारीपासून असलेले भारत यात्रीही चालायला लागतात. यात्रे दरम्यान स्थानिक कार्यकर्ते, नागरिकही यात्रेमध्ये सामील होतात.

- रस्त्याच्या कडेला उभे असलेले किंवा ताफ्यात घुसू पाहणार्‍यांची तळमळ, भेटीची ओढ पाहून राहुल त्यांना बोलावून घेतात किंवा अचानक जवळ जातात त्यांची आस्थेने चौकशी करतात. चालता-चालता विविध क्षेत्रातील नागरिकांशी चर्चा करतात.

- दहा- बारा किलोमीटर अंतर चालल्यानंतर यात्रा ठरलेल्या वेळी सकाळी नऊ ते 10 दहा वाजताच्या सुमारास दुपारच्या विश्रांतीसाठी थांबते.

- ज्यांनी राहुल यांच्या भेटीची वेळ घेतली अशा दोघा-तिघांना राहुल भेटतात.

- या ठिकाणी तंबू क्रमांक एक आणि दोन असतात. एकामध्ये राहुल आणि त्यांच्या सोबतचे 118 भारत यात्री आणि दोनमध्ये इतर भारत यात्री थांबतात. दुपारच्या जेवणाची व्यवस्था तंबूजवळच असते. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथकही तंबुच्या प्रवेशद्वारावर असते.

-दुपारचे जेवण झाल्यानंतर यात्रा चारनंतर चालायला लागते. 10-12 किलोमीटर चालण्यानंतर कॉर्नर सभेच्या ठिकाणी यात्रा येते.

- कॉर्नर सभा झाल्यानंतर निवासाच्या ठिकाणीच जेवणाची व्यवस्था असते. राहुल यांचा ज्या ठिकाणी मुक्काम असतो त्या ठिकाणी कडक सुरक्षाव्यवस्था असते.

- ज्या कंटनरमध्ये राहुल आणि त्यांच्या सोबतचे 118 भारत यात्री आहेत त्या ठिकाणी वर्तुळाकारात कंटेनर लावले जातात. भोवती सुरक्षारक्षकांचे तंबू असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: गोपीनाथ मुंडेंची तिसरी लेक राजकारणात; यशश्री मुंडेंचा उमेदवारी अर्ज, प्रितम मुंडे बिनविरोध?

UGC NET Result: UGC NET निकाल कधी लागणार, जाणून घ्या मागील वर्षांचा ट्रेंड काय सांगतो?

Pune News : आयटी पार्कसह उद्योगांच्या समस्या सोडवा; विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांची सूचना

Neeraj Chopra: ऑलिंपिक रौप्य विजेत्या नीरज चोप्राला आता सुवर्णपदकाचा ध्यास; तांत्रिक बाबींमध्ये सुधारणेचा प्रयत्न

Shirur Accident : शिरूरमध्ये दुर्दैवी अपघात; पिकअप टेम्पोची धडक, दुचाकीवरील दोन तरुण ठार

SCROLL FOR NEXT