Congress MLA Bhai Jagtap esakal
महाराष्ट्र बातम्या

Bhai Jagtap News : शरद पवारांचं 'ते' वागणं आम्हाला खटकलंच; काँग्रेस आमदाराचा नेमका कोणावर निशाणा?

राजकीय मतभेद असू शकतात. मात्र, मनभेद असू शकत नाहीत - भाई जगताप

हेमंत पवार

शरद पवार पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला गेले याबद्दल आम्हाला काहीही वाटत नाही.

Karhad News : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) पुणे दौऱ्यातील एका कार्यक्रमात खासदार शरद पवार सहभागी झाले होते. आम्हाला काँग्रेस म्हणून विचाराल तर ते आम्हाला थोडं खटकलंच आहे, असं सूचक वक्तव्य आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी व्यक्त केलं.

काँग्रेस पक्षातर्फे राज्यात लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका सुरु आहेत. त्याअंतर्गत साताऱ्याचे निरीक्षक म्हणून आमदार जगताप हे कऱ्हाड (जि. सातारा) दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पंतप्रधान मोदींना पुण्यात प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी खासदार पवार गेले होते. त्यांच्या उपस्थितीवरुन त्यांच्या सहकारी पक्षातील काही नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

त्या प्रश्नावर आमदार जगताप म्हणाले, महाराष्ट्राची संस्कृती उच्चकोटीची आहे. राजकीय मतभेद असू शकतात. मात्र, मनभेद असू शकत नाहीत. त्यामुळं शरद पवार पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला गेले याबद्दल आम्हाला काहीही वाटत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. सुशिलकुमार शिंदेही (Sushil Kumar Shinde) त्या कार्यक्रमाला गेले होते.

विखे पाटलांना केलं बेदखल

आमदार जगताप यांची पत्रकार परिषद सुरु असताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासंदर्भातील एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रश्नावर आमदार जगताप यांनी कोण... कोण.. विखे कोण..? असे म्हणून त्यावर अधिक बोलणं टाळत त्यांना बेदखल केल्यासारखेच दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT