Mahavikas Aghadi esakal
महाराष्ट्र बातम्या

Congress MLA : 'मविआ'ला बसणार मोठा धक्का? अजित पवारांनंतर काँग्रेसचे आमदार फुटणार; भाजप खासदाराच्या दाव्याने खळबळ

'शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाऊन काँग्रेसचे नुकसान होईल'

सकाळ डिजिटल टीम

महाविकास आघाडी फुटल्यानंतर काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये सहभागी होतील, असा दावाही खासदार निंबाळकर (Ranjitsingh Nimbalkar) यांनी केला.

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर काँग्रेस आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. लवकरच काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडी फोडून बाहेर पडतील, असा खळबळजनक गौप्यस्फोट माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला.

महाविकास आघाडी फुटल्यानंतर काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये सहभागी होतील, असा दावाही खासदार निंबाळकर (Ranjitsingh Nimbalkar) यांनी केला. ते शनिवारी पंढरपुरात पत्रकारांशी संवाद साधत होते. काँग्रेस (Congress) सध्या महाविकास आघाडीचे नेतृत्व करीत असली तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाऊन काँग्रेसचे नुकसान होईल, अशी त्यांच्यामध्ये भीती आहे.

त्यामुळेच काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल, असेही खासदार निंबाळकर यांनी स्पष्ट केले. अर्थमंत्री अजित पवार यांनी मतदार संघातील विकासकामांसाठीच सर्व पक्षांच्या आमदारांना भरीव असा निधी दिला आहे. त्यातून कोणी आमदार स्वतःची कामे करत नाही.

आमदार रोहित पवारांना आमदार निधी विषयाचा अभ्यास थोडा कमी असावा, असा टोलाही खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी लगावला. यावेळी भाजपचे पांडुरंग वाघमोडे, आमदार बबनराव शिंदे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे, उत्तम जानकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT