suprim court 
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाआधी निर्णय दिला तर तो निर्णय बदलू शकतो, वाचा कसं?

सकाळ डिजिटल टीम

Uddhav Thackeray : शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर कुणाचा दावा? यावर आता ३० जानेवारीला निर्णय होऊ शकतो. काल तीन ते साडेतीन तास युक्तिवाद झाल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाच्या निवडणूक चिन्ह प्रकरणावर सुनावणी करताना ठाकरे आणि शिंदे गटाला २३ जानेवारीपासून सात दिवसांत लेखी उत्तर देण्यास सांगितले आणि पुढील सुनावणी ३० जानेवारीला ठेवली.

दरम्यान सुप्रीम कोर्टाआधी निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत निर्णय दिला तर काय होणार?. याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी महत्वाची माहिती दिली आहे. 

घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले, "महाराष्ट्राची ही स्थिती फार वेगळी आहे. पक्षाची संघटना जास्त महत्वाची आहे. ही लोक पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेत. पक्षाच्या विचारसरणीवर निवडून आले आहेत. त्यामुळे ते बाहेर पडल्यानंतर म्हणाले की आमचा पक्ष आहे. तर माझ्या मते ते चुकीचे आहे. विधानसभा-लोकसभेत कोण निवडून आले तिथे कोणाचे बहूमत आहे आणि पक्षात कुणाचे बहुमत आहे, दोघांना देखील महत्व आहे. या दोघांचा विचार व्हायला हवा पण दोघांची तुलना केली तर पक्ष संघटनेवर ज्याचा ताबा आहे त्याच्याकडे पक्ष संघटनेचा ताबा जातो."

पक्षातील बहुतांश लोक एकाच वेळी बाहेर पडले आणि ते दुसऱ्या पक्षात विलिन झाले. तर वाचतात नाहीतर ते अपात्र ठरतात. जे सोळा आमदार प्रथम बाहेर पडले. ते दोन तृतीयांश देखील होत नाहीत. ते दुसऱ्या पक्षात विलिन देखील झाले नाहीत. त्यामुळे ते अपात्र ठरण्याची शक्यता दांडगी आहे. त्यात एकनाथ शिंदे आहेत. अपात्र ठरले तर आमदारांना मंत्री राहता येत नाही. शिंदेंना मुख्यमंत्री राहता येत नाही. याचा अर्थ सरकार कोसळेल. १६ आमदार अपात्र झाले तर बाकीचे लोक देखील अपात्र ठरतात. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून घेतले असेल तरी निर्णय देण्याची घाई करु नये, असे उल्हास बापट यांनी स्पष्ट केले.  

निवडणूक आयोगाचा निर्णय बदलू शकतो -

"उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पदासाठी काही अडचण येणार नाही. उद्धव ठाकरे नियमित राहतील. १४ फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाची महत्वाची सुनावणी होणार आहे. त्यानंतर निकाल स्पष्ट होईल. निवडणूक आयोगाचा निर्णय देखील बदलू शकतो. बेसिक कायदा असा आहे की एखाद्या पक्षप्रमुखाचा कार्यकाळ संपत असेल तर पुन्हा निवडणूका होता. आयोग निर्णय देईल तेव्हा निवडणुका होता. तोपर्यंत पक्षप्रमुख पदावर नियमित राहू शकतात. मला नाही वाटत उद्धव ठाकरे यांनी काही अडचण येईल", असे घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT