Corona-Danger
Corona-Danger 
महाराष्ट्र

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची शंका आल्यास संपर्क साधा

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘‘कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची शंका आली तरी घाबरू नका, त्वरित डॉक्‍टरांशी संपर्क साधा,’’ असा सल्ला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिला आहे. ‘‘अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका,’’ असेही आवाहन त्यांनी केले. 

पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत, त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. भोंडवे यांनी हा सल्ला दिला आहे. डॉ. भोंडवे म्हणाले, ‘‘रुग्णाच्या खोकल्यातून काही तुषार त्यातील विषाणूंसह आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात, त्या वस्तूंना आपल्या हाताचा स्पर्श झाल्यावर ते विषाणू हातांना चिकटतात. त्यानंतर तो हात चेहऱ्याला किंवा नाकाला लावल्यास त्यामार्गे हे विषाणू आपल्या श्‍वसनसंस्थेत प्रवेश करतात. तेथे या विषाणूंचा संसर्ग होतो. गरोदर माता, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह रुग्ण, मूत्रपिंड विकाराचे रुग्ण, कर्करोग, दम्याचे रुग्ण, जुना व सतत बळावणारा खोकला असणाऱ्या रुग्णांना धोका आहे, त्यामुळे या रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.’

पालिकेकडून २८ जागा निश्‍चित 
पुणे - परदेशातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून दोन ते तीन दिवस विलगीकरण करून ठेवण्यासाठी महापालिकेकडून जवळपास २८ जागा निश्‍चित केल्या आहेत. या जागांवर पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे.

पुण्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या पाच रुग्णांवर डॉ. नायडू हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान परदेशातून पुण्यात येणाऱ्या नागरिकांना थेट घरी न जाऊ देता दोन ते तीन दिवस त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही,  यांची पूर्ण तपासणी करून मगच त्यांना सोडण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने स्वतः मालकीच्या इमारतींचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या मालकीच्या वापराविना पडून असलेल्या अनेक इमारती आहेत. त्यापैकी ज्या इमारती पूर्णतः महापालिकेच्या मालकीच्या आहेत. नागरी वस्तीपासून काही अंतरावर असलेल्या इमारतीदेखील आहेत. अशा जवळपास २८ इमारती महापालिकेने निश्‍चित केल्या आहेत. या इमारतीमध्ये साफसफाई, विद्युत, पाणीपुरवठा आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. आवश्‍यकता वाटल्यास आणखी काही इमारती ताब्यात घेण्यात येईल, असे महापालिकेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Economy : भारत २०२५ पर्यंत चौथी अर्थव्यवस्था ; जी-२० शेर्पा व निती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांचा विश्वास

SAKAL Exclusive : संवेदनशील प्रकरणांत भाजपचे मौन धोकादायक; राष्ट्रीय काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांचे मत

Lalu Yadav : जहानाबाद लोकसभेच्या जागेवरुन लालू यादवांचं टेन्शन वाढलं; आरजेडीच्या बंडखोराचा उमेदवारी अर्ज...

Latest Marathi News Live Update : मुंबई होर्डिंग दुर्घटनेचे देशभरात पडसाद, रायपूर महानगरपालिकेचे मोठे पाऊल

Maval Lok Sabha: मावळ लोकसभेत विजय शिवसेनेचाच! पण, कोणत्या?  ५४.८७ टक्के मतदान सिद्ध करणार अस्तित्व

SCROLL FOR NEXT