Controversial statement of Shiv Sena MLA Santosh Bangar Controversial statement of Shiv Sena MLA Santosh Bangar
महाराष्ट्र बातम्या

शिवसैनिकाचे वादग्रस्त विधान, बंडखोर आमदारांच्या बायकांबद्दल म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. कोण कधी बदलेल, कोण कोणाबद्दल अपशब्द वापरेल हे सांगता येत नाही. याचा चांगला अनुभव महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणावरून पाहायला मिळत आहे. कट्टर शिवसैनिकाने केलेल्या बंडामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. (Controversial statement of Shiv Sena MLA Santosh Bangar)

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने राज्य सरकार हादरले आहे. शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह आधी सुरत नंतर गुवाहाटीत तळ ठोकून आहे. ते महाराष्ट्रात यायला अद्याप तरी तयार असल्याचे दिसत नाही आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे मंत्री मुंबईत परतल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नसल्याचे म्हणत आहे.

दोन्ही आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. एकमेकांना पाहून घेण्याची भाषाही नेत्यांकडून वापरली जात आहे. महाराष्ट्रातील राजकारण अतिशय खालच्या पातळीवर गेले आहे. अशात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

बंडखोर आमदारांवर (MLA) निशाणा साधताना ‘बंडखोर आमदारांच्या बायका सोडून जातील. त्यांच्या मुलांना बायको मिळणार नाही’ असे वादग्रस्त वक्तव्य संतोष बांगर यांनी केले आहे. यावरून राज्यातील राजकीय परिस्थिती किती खालच्या पातळीवर गेली आहे, हे पाहायला मिळते.

संपर्क करण्यासाठी संवाद दौरा

शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईमधून मतदारसंघात परतलेल्या संतोष बांगर यांनी दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात शिवसैनिकांना थेट संपर्क करण्यासाठी संवाद दौरा सुरू केला आहे. वसमत शहरात संवाद दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार संतोष बांगर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : महाकाळा परिसरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT