corona Restrictions relax sakal
महाराष्ट्र बातम्या

मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल करावेत

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची मागणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये(Corona restriction) सुधारणा करून विवाह व अन्य सार्वजनिक समारंभामध्ये ५० टक्के क्षमतेने अथवा जास्तीत जास्त २०० जणांची उपस्थिती तसेच शैक्षणिक संस्था ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (Maharashtra Chamber of Commerce and Industry)वतीने अध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बुधवारी केली.

महाराष्ट्र चेंबर तर्फे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह संबंधित विभागांच्या सचिवांना चेंबर तर्फे निवेदन दिले. या मागणीसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे. चेंबरचा भूमिका मांडताना ललित गांधी यांनी म्हटले आहे की लग्नसमारंभ, सभा, सामाजिक कार्यक्रम, परिसंवाद आदींसाठी ५० जणांची मर्यादा निश्‍चित केली आहे. अशा प्रकारच्या आयोजनांवर कार्यक्रमांचे नियोजन करणारे, भोजन, मांडव व्यावसायिक, सजावटकार, बँड आदी अनेक छोट्या -छोट्या व्यावसायिकांचा रोजगार व उदरनिर्वाह अवलंबून आहे. ५० जणांच्या मर्यादेमुळे हे सर्व व्यावसायिक अडचणीत आले आहेत. सध्या चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. याच धर्तीवर अशा समारंभांनाही ५० टक्के क्षमतेने अथवा जास्तीत जास्त २०० उपस्थितीच्या मर्यादेत यापैकी जे कमी असेल त्या संख्येने आयोजन करण्यासाठी परवानगी असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन शिक्षण घातक

शाळांच्या संदर्भात ललित गांधी म्हणाले, की शाळा-महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन शैक्षणिक वर्षात ऑनलाइन पद्धतीने शाळांचे वर्ग सुरू होते. त्याचा मोठा दुष्परिणाम मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर, मानसिक अवस्था व व्यक्तिगत जीवनावर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील निर्बंध उठवून शाळा सुरू झाल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने शिकलेला अभ्यासक्रम विसरला गे असल्याचे ७० टक्के विद्यार्थ्यांनी नमूद केले आहे. अनेक विद्यार्थी मोबाईल वापराच्या आहारी गेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना समुपदेशनासह वैद्यकीय उपचारांची गरज पडत आहे. काही विद्यार्थ्यांना दृष्टीविकार जडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT