Corona update 
महाराष्ट्र बातम्या

Corona Update: राज्यात दिवसभरात 5,226 नवे रुग्ण

अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात आज दिवसभरात 5,225 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळं करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 64,11,570 झाली आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी कमी होऊन 57,579 इतकी झाली आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आज दिवसभरात 5,557 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62,14,921 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96.93 टक्के एवढं झालं आहे.

राज्यात मृत्यूचा आकडा काहीसा कमी झाला असून आज 154 रुग्ण दगावले. मंगळवारी 158 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. अकोला मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. पुणे मंडळात आज सर्वाधिक मृत्यू झाले असून तेथे 67 मृत्यूची नोंद झाली. ठाणे 23, नाशिक 18, कोल्हापूर 39, औरंगाबाद 2, लातूर 4, नागपूर 1 मृत्यू नोंदवले गेले. राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1,35,567 वर पोहोचला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,17,14,950 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,11,570 (12.4 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,29,047 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 2,614 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT