Omicron variant Sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्याला दिलासा ! फेब्रुवारी अखेरीस संपणार तिसरी लाट; टास्क फोर्सची माहिती

गाफिल राहून चालणार नाही, टास्क फोर्सचे आवाहन

भाग्यश्री भुवड

मुंबई : राज्यात ओमिक्रॉनची तिसरी लाट (omicron third wave) जितक्या वेगाने पसरली तितक्याचे वेगाने ती ओसरली. पण, आता ही लाट फेब्रुवारी अखेरीस संपणार (omicron wave may end in February) असल्याचा दिलासा राज्य टास्क फोर्सच्या (corona task force) सदस्यांनी व्यक्त केला आहे. तिसरी लाट जरी ओसरली तरी अद्याप गाफिल राहून चालणार नाही असे आवाहनही टास्क फोर्स तज्ज्ञांनी केले आहे. यासह राज्य सर्वेक्षण अधिकारी डाॅ. प्रदीप आवटे (Pradip Awate) यांनी ही दुजोरा दिला असून पुढच्या 15 ते 20 दिवसांत तिसरी लाट आटोक्यात येईल असे साांगितले आहे.

असे जरी असले तरीही कोविड नियमांना बगल देऊन चालणारे नसून गाफिल राहून चालणार नसल्याचे आवाहन टास्क फोर्स तज्ज्ञांनी केले आहे आहे. दरम्यान तिसरी लाट आता संपत आली. येणाऱ्या पंधरा दिवसात रुग्णसंख्या तळाला पोहचेल.  म्हणजेच फेब्रुवारीच्या अखेरीस तिसरी लाट संपलेली असेल. राज्यात 23 जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी दर सरासरी पेक्षा जास्त आहे. सगळ्या जिल्ह्यात सरासरी एकच असणे शक्य नसते. सगळ्या जिल्ह्यात सरासरी एकच असणे शक्य नसते. चार जिल्ह्यात कमी चार जिल्ह्यात जास्त अशी स्थिती राहणार असल्याचे सांगत राज्यातील एकूण कोरोना ओसरलेला असणार असल्याच्या माहितीला डॉ. आवटे यांनी दुजोरा दिला.

दरम्यान, राज्यातील घटत्या आकडेवारी वर नजर टाकल्यास ही दुपटी तिपटीने रुग्ण संख्या कमी झालेली दिसून येईल. राज्यात 30 जानेवारी रोजी 22,444 रुग्ण संख्या होती. तेच तर 9 फेब्रुवारी रोजी ही संख्या 7,142 एवढी होती. हा उतरता आलेख सतत उतरत राहिला. 31 जानेवारी रोजी राज्यात 15,140, 1 फेब्रुवारी रोजी 14 हजार 372, 2 फेब्रुवारी रोजी 18 हजार 67 रुग्ण, 3 फेब्रुवारी रोजी 15 हजार 252 , 4 फेब्रुवारी रोजी 13 हजारा 840, 5 फेब्रुवारी रोजी 11 हजार 394 रुग्ण, 6 फेब्रुवारी रोजी 9 हजार 666 रुग्ण, 7 फेब्रुवारी रोजी 6 हजार 436, 8 फेब्रुवारी रोजी 6 हजार 107 अशी उतरती संख्या होती. तर मुंबईत 29 जानेवारी ते 8 फेब्रुवारी पर्यंतच्या कालावधीत 1 हजार 411 वरुन 441 रुग्ण संख्या आली आहे.

मास्क अनिवार्य

दरम्यान, राज्यात रुग्णसंख्या कमी झाले असले तरी त्रिसूत्री पाळली पाहिजे. मास्क हा अनिवार्य आहे, त्याच्यासोबत हात धुणे,अंतर पाळणे गरजेचे आहे, लक्षणे असतील तात्काळ चाचणी करावी असेही डॉ. जोशी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमधील बडी काली मंदिराला दिली भेट

SCROLL FOR NEXT