Corona 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात कोरोनाचा उद्रेक; मृत्यूदर मात्र कमी

सकाळवृत्तसेवा

पहिल्या लॉकडाउनला वर्ष पूर्ण; आताचा विषाणू सौम्य
पुणे - राज्यात सप्टेंबरमध्ये कोरोनाचा असलेला उच्चांकी उद्रेक नियंत्रित होण्यासाठी पुढचे पाच महिने लागले. आता पुन्हा कोरोना डोके वर काढू लागला आहे. राज्यात आतापर्यंतच्या उद्रेकातील सर्वांत कमी मृत्यूदर सध्या आहे, हा साथरोग उद्रेकातील सर्वात मोठा दिलासा असल्याचा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला. त्यानंतर सातत्याने रुग्णांची संख्या बेसुमार वेगाने वाढू लागली. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशात २५ मार्चपासून २१ दिवसांचे पहिले लॉकडाउन झाले. त्याला आता एक वर्षपूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने वैद्यकीय तज्ज्ञांशी ‘सकाळ’ने साधलेल्या संवादात वैद्यकीय तज्ज्ञांनी हा विश्वास व्यक्त केला. राज्यात ४ सप्टेंबरला दोन लाख १० हजार ९७८ सक्रिय रुग्ण होते. ती संख्या ९ फेब्रुवारीपर्यंत ३४ हजार ६४० पर्यंत कमी आली होती. गेल्या महिन्याभरात संसर्गाचे प्रमाण वाढल्याने रुग्णसंख्येने पुन्हा दोन लाखांचा आकडा ओलांडला, असे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्याने नोंदविले. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दिशेने जात आहे का, याचे निरीक्षण करत असल्याचा विश्वास साथरोग तज्ज्ञांनी नोंदविला. 

सर्वाधिक रुग्णांची नोंद 
राज्यात यंदा ३० हजार रुग्ण आढळले. ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्या दिवशी अमरावतीमध्ये ८० टक्क्यांनी रुग्णांची संख्या कमी झाली आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यातील उद्रेक कमी होत असल्याचे यातून दिसते. तीन आठवड्यात अमरावतीमधील रुग्ण कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे राज्यात एकाबाजूला रुग्ण वाढत असल्याचे चित्र दिसत असले तरीही दुसरीकडे रुग्णांची संख्याही कमी होत आहे, हे चित्र आशादायक आहे.

महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर
दर दहा लाखामागे रुग्ण आढळणाऱ्या देशातील राज्यांमध्ये दिल्ली, पाँडेचेरी, गोवा अशी राज्ये पुढे आहे. महाराष्ट्र हे सातव्या क्रमांकावरचे राज्य आहे. सिक्कीम, लडाख, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश येथेही रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात रुग्णवाढीचा दर ८० टक्के आहे. इतर राज्यांमध्ये तो १०० टक्क्यांहून अधिक आहेत. महाराष्ट्र हे मोठे राज्य असल्याने त्याची संख्या सर्वाधिक दिसते. पण, टक्केवारीमध्ये महाराष्ट्र देशात आठव्या क्रमांकावर आहे.

डॉक्टरांचे निरीक्षण...

  • कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेत आताचा विषाणू सौम्य जाणवतो. 
  • ससंर्गाचे प्रमाण वाढत असले तरीही अत्यवस्थ रुग्णांची संख्या कमी.
  • उच्च मध्यम आणि उच्चभ्रू वर्गात संसर्गाचे प्रमाण जास्त

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कोरोना संसर्गामुळे ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. तरुणांना या विषाणूंचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. पण, त्यातून रुग्ण बरे होत आहेत.
- डॉ. परीक्षित प्रयाग, वैद्यकीय तज्ज्ञ

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT