Corona Updates
Corona Updates File photo
महाराष्ट्र

राज्यात 21 जिल्ह्यांत दिलासादायक चित्र; 14 जिल्ह्यांत चिंता कायम

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई, (Mumbai) ठाणे, (Thane) नागपूरसारख्या (Nagpur) दाटीवाटीच्या शहरांमध्ये (City) कोरोना संसर्गाचा (Coronavirus) जोर ओसरू लागला. त्याच वेळी राज्यातील अनेक ग्रामीण जिल्ह्यांमध्ये मात्र रुग्णसंख्या (Patient) वाढत (Increase) आहे. यात कोकणापासून पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश असल्याने चिंतेत भर पडली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून महाराष्ट्राची (Maharashtra) रुग्णसंख्या कमी होते आहे. काही जिल्ह्यांत जोर ओसरत असला तरी १६ जिल्ह्यांमधील रुग्ण वाढतच आहे. तेथील रुग्णवाढ नियंत्रणात आणण्यास प्रशासनाला (Administrative) अद्याप यश आलेले नाही त्यामुळे स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Coronavirus Increase Sixteen Big Citys in Maharashtra)

रुग्णसंख्या वाढीचे जिल्हे

राज्यातील १६ जिल्हे असे आहेत जिथे रुग्णसंख्येचा दैनंदिन आलेख चढता असल्याचे दिसते. यामध्ये पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

रुग्णवाढीची कारणे

कोरोनाची दुसरी लाट वेगवेगळया भागात वेगवेगळ्या वेळेत आली, असे राज्य कृती दला (टास्क फोर्स) चे सदस्य डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले. अकोला, अमरावती, यवतमाळ या भागांत साधारणतः फेब्रुवारीत या लाटेचा प्रभाव सर्वात आधी जाणवला. त्यानंतर मार्चमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या भागात ही लाट दिसली. ती १५ मे पर्यंत ओसरण्याची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात ही लाट पसरली असून तिने सध्या उग्र रूप धारण केल्याचे दिसते.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांत रुग्णसंख्या कमी होते आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. नांदेड, धुळे, मुंबई, भंडारा, ठाणे, नाशिक, लातूर, नागपूर, औरंगाबाद, रायगड, उस्मानाबाद आणि गोंदिया या जिल्ह्यांमधील दैनंदिन नवीन रुग्णसंख्या कमी झाली आहे. महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करून चाचण्यांवर अधिक भर द्यायला हवा. लॉकडाउनची कडक अंमलबजावणी महत्त्वाची आहे. १२ जून पर्यंत ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात नेण्याची शक्यता आहे.

- डॉ.अविनाश सुपे , सदस्य, राज्य कृती दल

लाटेचा परिणाम

  • शहरांच्या तुलनेत ग्रामीण आरोग्य व्यवस्था सक्षम नसणे

  • शहरांत ‘ट्रेस, टेस्ट आणि ट्रीटमेंट’ वर अधिक भर. ग्रामीण भागात आजही चाचण्यांचे प्रमाण कमी

  • ग्रामीण भागात संसर्ग, चाचण्या आणि लसीकरणाबाबत फारशी जनजागृती झाली नाही

  • दुसरी लाट येण्याआधीच शहरांतील पालिका प्रशासनाने ज्या उपाययोजना राबवल्या त्या ग्रामीण भागात राबवणे शक्य झाले नाही.

  • शहरांमध्ये लॉकडाउनची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली. पोलिसांच्या तसेच पालिका प्रशासनाच्या मदतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. ग्रामीण भागात याला फारसे यश मिळाले नाही

  • शहरी भागात रातोरात रुग्णालये, कोरोना काळजी केंद्र उभी करण्यात आली. अनेक ठिकाणी खाटा, आयसीयू, ऑक्सिजनची व्यवस्था करणे शक्य झाले. ग्रामीण भागात या सोयी-सुविधांचा अभाव

  • ग्रामीण भागात दूरवरील रुग्णालयांमध्ये जावे लागत असल्याने तेथील परिस्थिती बिकट झाली

ग्रामीण भागातील अडचणी

  • आरोग्य व्यवस्था मजबूत नसल्याने तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता

  • गंभीर रुग्णांसाठी आवश्यक आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची अपुरी व्यवस्थ

  • गंभीर रुग्ण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकेची कमतरता

  • ऑक्सिजन साठवण्याची क्षमता कमी असल्याने ऑक्सिजनची उपलब्धता कमी

  • कामानिमित्त लोकांचे तालुका आणि जिल्हा स्तरावर जाणे-येणे सुरू असल्याने संसर्गात वाढ

या उपाययोजना आवश्यक

  • चाचण्यांवर भर देणे

  • लॉकडाउनची कडक अंमलबजावणी

  • आरोग्य व्यवस्था सक्षम करणे

  • खाटा, आयसीयू, व्हेंटिलेटरची उपलब्धता वाढवणे

  • रेमडेसिव्हिरसारख्या इंजेक्शनचा पुरवठा नियमित करणे

  • लसीकरणाचा वेग वाढवणे

आठवड्याभरातील परिस्थिती

जिल्हे रुग्णसंख्या(आता-पूर्वी) एकूण वाढ

पालघर : ३९,१२७ -३५,७७६ ३,३५१

रत्नागिरी : ३०,८६४ -२५,९८३ ४,८८१

सिंधुदुर्ग : १७,२८३ -१४,३७१ २९१२

सातारा : १,२५,०७१-१,११,५९० १३,४८१

सांगली : ६८,९८९-५९,६८३ ९,३०६

कोल्हापूर : ५८,३७९-५०,३७९ ८,०००

सोलापूर : ९८,४८१-८७,१८० ११,३०१

नंदुरबार : ३७,१५८-३५,८०४ १,३५४

बीड : ६८,८६८-६०,७०२ ८,१६६

परभणी : २६,९२६-२३,८०१ ३१२५

हिंगोली : १५,७२७-१४,६४४ १,०८३

अमरावती : ३३,५११-२८,७२७ ४,७८४

बुलडाणा : ६१,४२८ -५१,२८५ १०,१४३

वर्धा : ५०,४०९-४५,८९५ ४,५१४

गडचिरोली : २४,२२४-२१,४९८ २,७२६

चंद्रपूर : ४९,४१५-४३,३७९ ६,०३६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT