महाराष्ट्र

लॉकडाऊन अटळ; किमान १५ दिवसांच्या कडक निर्बंधांची शक्यता 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई  : ‘‘कोरोना साथीची साखळी तोडायची असेल तर, राज्यात कडक लॉकडाउन लागू करण्याशिवाय पर्याय नाही,’’ असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडले. ‘‘राज्यातील जनतेचा जीव वाचणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सहकार्य करा. राजकारण करू नका,’’ असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना केले. तर, विरोधी पक्ष असलेल्या भाजपने, ‘अगोदर मदत जाहीर करा, मगच लॉकडाउन करा,’ अशी भूमिका घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाउन विषयी सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा केली. त्यातून राज्यात कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाउन शिवाय पर्याय नसल्याचे पुढे आले असून किमान पंधरा दिवसांसाठी राज्यात सरसकट कडक लॉकडाउन लागू केला जाऊ शकतो.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यातील कोरोना साथीचा आढावा घेतला. कुंटे यांनी आकडेवारीसह परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार, राजेश टोपे तसेच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, वैद्यकीय संचालक तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.

साखळी तोडणे गरजेचे
यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधी पक्षांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ‘‘कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे आहे. आता निर्णय घेण्याची वेळ आहे. राज्यात लॉकडाउनला पर्याय नाही. संसर्ग झालेला एक रुग्ण सुमारे २५ जणांना बाधित करतो, त्यामुळे ही साखळी तोडणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणात तरुण, लहान मुले बाधित होत आहेत. त्यामुळे एकमुखाने निर्णयाची वेळ आली आहे. यात राजकारण नको. केंद्राकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरची मागणी केली आहे. आता लॉकडाउनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.’’ 

राज्यात कडक लॉकडाउनची गरज आहे. नाहीतर १५ एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल, असा इशारा मुख्य सचिवांनी बैठकीत दिला. सर्वांसमोर त्यांनी कोरोनासंबंधी सादरीकरणही केले.

कोण काय म्हणाले ...
उपमुख्यमंत्री अजित पवार : वेगवेगळ्या ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे. पुण्यात रुग्णांचा आकडा लाखाच्या पार गेला आहे. त्यामुळे यावर गंभीर उपाय शोधताना लॉकडाउन सरसकट करावा लागेल.

अशोक चव्हाण : कोरोना रोखण्यासाठी निर्बंध लावताना समतोल असावा. निर्बंध लागू करताना गरजू घटकांचाही विचार व्हावा. सरकारची भूमिका आणि निर्णयाबाबतचा अपप्रचार व गैरसमज टाळण्यासाठी आणि वस्तुस्थिती अधिकृतपणे लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी निवडक मंत्री नियुक्त करून त्यांनी नियमितपणे सर्वांना माहिती द्यावी. महाराष्ट्राने चाचण्या वाढवल्याने रूग्णांची संख्या वाढणे स्वाभाविक आहे. ही वस्तुस्थिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. कर्जफेडीसाठी गतवर्षीप्रमाणे पुन्हा मॉरेटोरियम योजना लागू करण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करावी. कठोर लॉकडाउन लागू होणार असेल तर, बाहेरगावी असलेल्या नागरिकांना आपआपल्या घरी जाण्यासाठी म्हणून काही कालावधी देण्यात यावा.

बाळासाहेब थोरात : काँग्रेस पक्ष सरकारच्या पाठीशी असून पूर्ण सहकार्य करेल. पण लॉकडाउन लावण्यापूर्वी काही घटकांचा विचार सरकारने करावा.

विजय वड्डेट्टीवार : किमान तीन आठवड्यांचा लॉकडाउन केला जावा. तरच ही साखळी तुटण्यास मदत होईल.

आरोग्यमंत्री राजेश टोपे : राज्याला मदत व्हावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा. केंद्राकडे मदत मागावी. किमान मी तरी कोरोनाबद्दल राजकारण करत नाही. पुणे, मुंबई, नागपूरमध्ये व्हेंटिलेटर वाढविण्याची गरज आहे.

आधी मदत जाहीर करावी
‘‘सरकारने लॉकडाउन जाहीर करण्यापूर्वी मदत जाहीर करावी. मगच लॉकडाउन जाहीर करावा. कोणत्याही स्तरातील जनतेला त्याचा फटका बसता कामा नये. लोक लॉकडाउनच्या विरोधात आहेत,’’ असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘आम्ही राजकारण बंद करतो. पण, तुमच्या मंत्र्यांना आणि सहकाऱ्यांनाही समज द्या. आम्ही सहकार्य करू, पण त्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या. मंदिरावर अवलंबून असलेले, केशकर्तनालय यांच्या मदतीचा विचार व्हावा. पूर्ण नुकसान भरपाई नको पण, हे लोक जगले पाहिजे याचा विचार व्हावा. त्याचबरोबर कोरोना रिपोर्ट तातडीने मिळावेत म्हणजे प्रसार कमी होईल. रेमडेसिव्हिरचा तुटवडा आहे. राज्याने हस्तक्षेप करावा. परराज्यात, परदेशात जाणारे रेमडेसिव्हिर रोखले पाहिजे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा, ऑक्सिजन बेड उपलब्ध करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT