coronavirus sakal
महाराष्ट्र बातम्या

होम क्वारंटाईन : १,०७५ रुग्णांमुळे कुटुंबीयांचा जीव धोक्यात

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : देशात कोरोनाचे (coronavirus) रुग्ण पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. तसेच ओमिक्रॉनचे रुग्णही आढळून येत आहे. औरंगाबाद शहरात बाधित मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. असे असतानाही सरकारने जास्तीत जास्त जणांना रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे औरंगाबाद शहरात तीन हजार ३४० रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. यापैकी तब्बल १,०७५ जणांनी कोरोनाची लस घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

औरंगाबाद शहरात ओमिक्रॉनसह (omicron variant) कोरोनाची (coronavirus) लाट आली आहे. वीस दिवसांत तब्बल सहा हजार नागरिक कोरोनाबाधित (coronavirus) आढळून आले आहेत. यातील तब्बल तीन हजार ३४० रुग्णांना तीन दिवसांत गृह विलगीकरणात (home quarantine) ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वॉररूममधून यंत्रणाही सक्रिय केली आहे. वॉररूममधून गृह विलगीकरणातील बाधितांना दिवसातून तीन वेळा फोन करून चौकशी केली जात आहे. वॉररूममधून थेट डॉक्टरच कोरोनाबाधितांशी संपर्क साधत आहेत. रुग्णांशी चर्चा करून आवश्यक ते मार्गदर्शन डॉक्टरांकडून केले जाते.

कुटुंबीयांनाही कोरोना

रुग्णांशी डॉक्टर संपर्क साधत असल्याने तीन हजार ३४० रुग्णांपैकी दोन हजार ४४ रुग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेतले, तर एक डोस (corona vaccine) घेतलेल्यांची संख्या २२१ आहे. तर तब्बल १,०७५ रुग्णांनी लसीचा एकही डोस घेतलेला नसल्याचे पुढे आले आहे. ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही अशा रुग्णांमुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोना झाल्याचे देखील लक्षात आले आहे.

...तर आरोग्यावर फार काही परिणाम होत नाही

लसीचे दोन्ही डोस (corona vaccine) घेतल्यावर कोरोना झाला तरी त्याची तीव्रता कमी असले. त्याचा आरोग्यावर फार काही परिणाम होत नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे, असे पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT