rahul gandhi esakal
महाराष्ट्र बातम्या

RSS नेत्याला राहुल गांधींना द्यावा लागणार दंड; कोर्टाचा आदेश

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 2014 मध्ये गांधीहत्येला RSS कारणीभूत असल्याचं आपल्या भाषणात म्हटलं होत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 2014 मध्ये गांधीहत्येला RSS कारणीभूत असल्याचं आपल्या भाषणात म्हटलं होतं. त्यावरुन निर्माण झालेला वाद कोर्टात गेला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातील भिवंडीतील प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राजेश कुंटे यांना 1,000 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने यापूर्वी कुंटे यांना 500 रुपयांचा दंड ठोठावला होता पण अजूनही त्यांनी तो भरला नसल्याची माहिती न्यायालयाने दिली.

दरम्यान राहुल गांधी यांनी 2014 मध्ये भिवंडी येथे भाषण करताना महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात भिवंडी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर गांधी यांना न्यायालयासमोर उभं करण्यात आलं होतं. त्यानंतर ही केस 2014 पासून पुराव्याच्या कारणावरुन प्रलंबित होती. दरम्यान कुंटे यांनी याचिका दाखल केल्यावर एक साक्षीदार दिला होता. त्यानंतर दिल्लीच्या एका नोटरीच्या कारणावरुन न्यायालयाने हे प्रकरण नाकारले होते. मग कुंटे यांनी उच्च न्यायालयात या ऑर्डरला आव्हान दिले होते.

सध्याच्या सुनावणीदरम्यान, कुंटे यांच्या वकीलाने सांगितले की त्यांना भिवंडीच्या निजामपूर पोलीस ठाण्यातील एक पोलिस अशोक सायकर यांचे परीक्षण करायचे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कुंटे यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये सायकर यांनी घडलेल्या घटनेवर रिपोर्ट दाखल केला होता. यावेळी एनव्ही अय्यर यांनी राहुल गांधी यांची बाजू मांडली आहे.

सुनावणीदरम्यान दंडाधिकारी डॉ. जे. व्ही. पलीवाल म्हणाले, "कुंटे यांनी मूलभूत तथ्य किंवा कारणे सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करावेत. नंतर, तुम्ही समर्थन देण्यासाठी इतर साक्षीदारांचे परीक्षण करू शकता. तक्रारदाराच्या पुराव्याशिवाय या प्रकरणाशी निगडीत असलेल्या साक्षीदाराची (पोलिस अशोक सायकर) चौकशी करता येणार नाही. पुराव्याशिवाय साक्षीदाराची चौकशी करणे हे विलंबासाठी कारण होऊ शकेल." असं म्हणत न्यायालयाने पुरावे सादर करण्यास सांगितलं आहे.

"न्यायालय या प्रकरणावर 10 मे रोजी पुन्हा सुनावणी करणार असून तक्रारदाराने पुढच्या वेळेस सबळ पुरावे सादर करावेत आणि आरोपी गांधी यांना पुरावे सादर करण्यास उशीर केल्याप्रकरणी 1000 रुपये दंड स्वरुपात द्यावेत." असं न्यायदंडाधिकारी यांनी सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT