crime esakal
महाराष्ट्र बातम्या

Crime: नात्याला काळीमा फासणारी घटना! ७० वर्षीय आजोबाचा अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार

शहर पोलिसांत गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

वर्धा: आजी-आजोबाकडे राहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन नातीवर तिच्या ७० वर्षीय आजोबाने अत्याचार केला. ही घटना वर्धा शहरात उघडकीस आली. घटना उजेडात येताच अत्याचार करणाऱ्या वृद्ध आजोबाने पलायन केले. मुलीने दिलेल्या तक्रारी वरून शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, १६ वर्षीय पीडितेच्या वडिलांची नोकरी रायपूर जिल्ह्यातील सड्डू येथे असल्याने ती कुटुंबासह तेथेच राहते.पीडितेच्या आई व वडिलांचे घर वर्ध्याला असल्याने पीडिता आई व वडिलांसह वर्ध्याला येणे जाणे होते.

७ डिसेंबर २०२२ मध्ये पीडितेच्या आईच्या आजीचे निधन झाल्याने सर्व कुटुंबीय वर्धा येथे आले होते. दरम्यान, पीडिता ही वरील खोलीत आराम करीत असताना ७० वर्षीय नराधम आजोबाने खोलीत प्रवेश करून पीडितेचे लैंगिक शोषण केले.

पीडितेने बदनामी आणि भीतीपोटी ही बाब आई-वडिलांना सांगितली नव्हती. मात्र, पीडितेवर मानसिक उपचार सुरू असताना तिने मागील काही वर्षांपासून तिच्यासोबत सुरू असलेला हा धक्कादायक प्रकार मानसिकरोग तज्ज्ञांसमोर कथित केला अन् हे बिंग फुटले.

मागील सहा वर्षांपासून पीडितेवर आजोबा अत्याचार करीत असल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. कुणालाही ही बाब तिला सांगता देखील येत नव्हती. अखेर बिंग फुटले अन् हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. पीडितेने आई-वडिलांना सर्व घटना सांगितल्याने वडिलांनी थेट शहर पोलिस ठाणे गाठले. शहर पोलिसांनी याप्रकरणी ७० वर्षीय नराधम आजोबाविरुद्ध अत्याचारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

आत्महत्येचा प्रयत्न

डिप्रेशनमध्ये गेलेली पीडिता ही खचून गेली होती. तिच्यापुढे कुठलाही मार्ग नव्हता. घरच्यांना ही बाब ती सांगू शकत नव्हती. अखेर पीडितेने स्वत:ला संपविण्याचा विचार केला.

पीडितेचे फेब्रुवारी २०२३ मध्ये दहावीची सराव परीक्षा सुरू असताना तणावातून स्वत:च्याच हातापायावर ब्लेडने चिरे मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अखेर हे विदारक चित्र तिच्या आई-वडिलांना दिसले.

आई-वडिलांनी पीडितेला विचारणा केली पण, पीडितेने घडत असलेला प्रकार सांगितला नाही. अखेर घरच्यांनी पीडितेला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले आणि त्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT