महाराष्ट्र बातम्या

सध्या महाडमध्ये मदत पोहोचवणं कठीण? दरेकरांनी दिली नेमकी माहिती

एनडीआरएफचा बोटीने पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे.

वैदेही काणेकर

मुंबई: राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) टोळ फाट्यावर अडकून पडले आहेत. पुराने वेढलेल्या महाडमधील (mahad flood) जनतेपर्यंत मदत पोहोचवण्याचा त्यांचा उद्देश आहे. पण सध्या टोळ फाट्याच्या पुढे प्रचंड पाणी असल्याने ते तिथेच थांबले आहेत. त्यांच्यासोबत माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे आहेत. (Current situation it is difficult to reach with relief material at mahad flood affected area pravin darekar dmp82)

"महाडला जाण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. पाणी असल्यामुळे टोळ फाट्यावर थांबलो आहोत. एनडीआरएफचा बोटीने पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाड शहर पाण्याखाली आहे. लोक इमारतींच्या गच्चीवर, एसटीच्या टपावर बसले आहेत. खारवली, माटवण, राजावाडी सगळी गावं पुराने वेढली आहेत" अशी माहिती दरेकर यांनी दिली.

"हेलिकॉप्टर येत असल्यामुळे आशा निर्माण झाली आहे. लोकांपर्यंत मदत पोहोचवणे, त्यांना सुरक्षित स्थळी आता नेता येईल. आम्ही मुंबईशी संपर्कात आहोत. साहित्य आणलं, तरी तिथपर्यत पोहोचू शकत नाही. समन्वयाच्या अडचणी आहेत. मदत कशी पोहोचणार हा चिंतेचा विषय आहे. हेलिकॉप्टर आल्यामुळे आता यंत्रणा थोडी हलताना दिसत आहे" असे दरेकर म्हणाले.

कालपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे (heavy rain) महाडमध्ये भीषण पूरस्थिती (Mahad flood situation) निर्माण झालीय. महाडमधून वाहणाऱ्या सावित्री नदीने (savitri river) रौद्र रुप धारण केले आहे. महाडमध्ये तर लोकं जीव वाचवण्यासाठी एसटीच्या टपावर (st bus) बसले आहेत. इतकी भीषण परिस्थिती तिथे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT