Narendra Dabholkar Murder Case| Virendra Tawde|Sachin Andure  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Narendra Dabholkar Murder Case: दाभोलकर खून प्रकरणी कोर्टाने सुनावले पोलिसांना खडे बोल! तावडे, पुनाळेकर, भावे का ठरले निर्दोष?

Virendra Tawde: या प्रकरणातील दाभोळकरांची बाजू मांडणारे वकील तसेच दाभोळकरांचे पुत्र हमीद आणि मुक्ता दाभोळकर यांनी निर्दोष सुटलेल्या आरोपींविरोधात वरिष्ठ न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे.

आशुतोष मसगौंडे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने आज निकाल दिला. यामध्ये न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दुसरीकडे याच प्रकरणातील मुख्य सूत्रधारा असल्याचा आरोप असलेल्या वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

तावडे, भावे आणि पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तझा झाल्याने सर्वत्र उलट-सुलट चर्चा सुरू आहे. तसेच या प्रकरणातील दाभोळकरांची बाजू मांडणारे वकील तसेच दाभोळकरांचे पुत्र हमीद आणि मुक्ता दाभोळकर यांनी निर्दोष सुटलेल्या आरोपींविरोधात वरिष्ठ न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे.

मात्र, या खटल्याचा निकाल देताना विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव म्हणाले, या गुन्ह्यात आरोपी तावडेचा हेतू स्पष्टपणे दिसत आहे. त्याचबरोबर त्याच्यावर संशय घेण्यासही वाव आहे. मात्र, तावडेविरोधात हा गुन्हा सिद्ध करण्यात पोलिस तसेच सरकारला अपयश आले आहे. दुसरीकडे यातील इतर आरोपी भावे आणि पुनाळेकर यांच्याविरोधात पोलीस भक्कम पुरावे सादर करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना निर्दोष मुक्त करावे लागत आहे.

यावेळी न्यायाधीश पी.पी जाधव यांनी निकालात म्हटले आहे की, या प्रकरणात आरोपींवर संशय घेण्यास वाव होता. मात्र पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्याविरोधाच पुरावे उपलब्ध होऊ शकले नाहीत. म्हणूनच पुराव्यांच्या अभावी या प्रकरणातील तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करावी लागली. तसेच आरोपींविरोधात UAPA चे कलम सिद्ध होऊ शकले नाहीत.

बाचाव पक्षाच्या वकिलांना फटकारले

दरम्यान या खटल्याच्या सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी अनेक मुद्द्यांवर युक्तीवाद केला. यामध्ये एका युक्तीवादात आरोपींची बाजू मांडत असल्याना वकिलांनी डॉ. दाभोलकरांच्या हत्येचे समर्थन केले होते. त्यावेळी न्यायाधीशांनी त्यांना फटकारत अशा प्रकराच्या गंभीर गुन्ह्याचे समर्थन योग्य नसल्याचे म्हटले होते. वकिलांनी अशा प्रकारची चूक भविष्यात करू नये, असे न्यायाधीशांनी निकाल देताना नमूद केले.

दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने आज शिक्षा सुनावली. यामध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप आणि 5 लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली. तर या प्रकरणात कट रचल्याचा आरोप असलेल्या विरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना पुराव्याअभावी सोडण्यात आले आहे.

दरम्यान यातील सूत्रधारांची निर्दोष सुटका झाल्याने डॉ. दाभोलकरांचे पुत्र हमीद, कन्या मुक्ता आणि वकिलांनी त्यांच्याविरोधात वरिष्ठ न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheesh Mahal Delhi: दिल्लीतील 370 वर्षे जुने 'शीशमहाल' अखेर उघडले! जाणून घ्या तिकिट, वेळ आणि विशेष माहिती

आजचे राशिभविष्य - 11 जुलै 2025

मोठी बातमी! सोलापूर जिल्हा बॅंकेचे ६ शाखाधिकारी निलंबित; बनावट सोन्यावर दिले लाखोंचे कर्ज; माळशिरस, मंगळवेढा, सांगोल्यातील शाखांमधील धक्कादायक प्रकार

Panchang 11 July 2025: आजच्या दिवशी ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

व्रत आरोग्याचे!

SCROLL FOR NEXT