EknatH shinde 
महाराष्ट्र बातम्या

Dasara Melava : आम्ही गद्दारी नाही 'गदर' केलाय; CM एकनाथ शिंदेंची 'सनी स्टाईल'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर कडाडून टीका केली. आज पुन्हा एकदा उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटाला गद्दार म्हणून डिवचलं. याला प्रत्युत्तर आता एकनाथ शिंदे यांनी दिलं. एकनाथ शिंदे यांनी अभिनेता सनी देओलच्या स्टाईलमध्ये ठाकरेंना उत्तर दिलं. (Eknath Shinde news in Marathi)

उद्धव ठाकरेंच्या गद्दार टीकेला एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही गद्दारी गदर केला. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व महत्त्वाचं आहे, आपण सगळे बाळासाहेबांचे निष्ठावंत भक्त आहोत. त्यांचे खरे वारसदार.. विचारांचे वारसदार.. वारसा हा विचारांचा असतो तो जपायचा असतो.. आम्ही विचारांचा वारसा जिवापाड जपला आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांचे पाईक आम्ही आहोत, असंही शिंदे म्हणाले.

गद्दारी झाली आहे, पण ती २०१९ ला झाली. ज्यावेळी ही आघाडी झाली, त्यावेळी खरी गद्दारी झाली, तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, एका बाजूला बाळासाहेबांचा आणि मोदींचा फोटो लावल्यामुळे लोकांनी तुम्हाला मतदान केलं पण त्यांच्या मताला तुम्ही नाकारलं म्हणून महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही गद्दारी केली, असही शिंदे म्हणाले.

जे आता मंत्री झाले त्यांनी आधी काठ्या खाल्ल्या, घरावर तुळशीपत्र ठेवलं, काम केलं आणि तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता... ज्यावेळी ही आघाडी होत होती त्यावेळी अनेकजण आम्हाला सांगत होते ही आघाडी खड्ड्यात घालणारी आहे... पण आम्ही आदेश पाळणारे शिवसैनिक होतो पण तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT