Mla Disqualification Case Maharashtra Esakal
महाराष्ट्र बातम्या

Mla Disqualification Case Maharashtra: तारीख ठरली! शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणावर आता एकत्रितपणे सुनावणी

शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणावर आता एकत्रितपणे सुनावणी पार पडणार आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

एकीकडे निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याची लढाई सुरू असतानाच आता दुसरीकडे निवडणूक आयोगासमोर शरद पवार गटाकडून आमदार अपात्रतेसंबधी याचिका दाखल करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेची कारवाई करावी यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

'विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदारांवर कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. मात्र, त्यांनी आणखी कुठलीही कारवाई केली नाही. अध्यक्ष वेळखाऊ पणा करत आहेत म्हणून त्यांना कारवाईचे निर्देश द्या', असं म्हणत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान आमदार अपात्रतेसंबधीच्या सुनावणीची तारीख ठरली आहे.

आमदार अपात्रतेसंबधीची पुढील सुनावणी शुक्रवारी (13 ऑक्टोबर)ला पार पडणार आहे. दरम्यान शिवसेना 16 आमदार आणि राष्ट्रवादी प्रकरणी एकत्र सुनावणी शुक्रवारी पार पडेल अशी माहिती समोर आली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षातील आमदार अपात्रतेची सुनावणी आता एकत्रितपणे पार पडणार आहे. शुक्रवारी 13 ऑक्टोबर)ला ही सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना अपात्रतेची सुनावणी आधी पुढच्या महिन्यात पार पडणार होती, मात्र, आता ती शुक्रवारी (13 ऑक्टोबर) ला पार पडणार आहे.

आता शिवसेना (ठाकरे गट) सुनील प्रभू आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या दोन्ही याचिकेवर एकत्र सुनावणी होईल. सुप्रीम कोर्ट महत्त्वाचे निर्देश 13 तारखेला देऊ शकतंय या सुनावणीकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

Pune News : महापालिकेच्या सर्वपक्षीय कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी लाखोची उधळपट्टी

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर एसटी बसच्या धडकेत दूचाकीस्वार तरूणाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT