Daulatabad Fort Mangal Prabhat Lodha esakal
महाराष्ट्र बातम्या

Daulatabad Fort : दौलताबाद किल्ल्याचं नामांतर करणार; पर्यटन मंत्र्यांची मोठी घोषणा

मागील काही दिवसांत औरंगाबादचं देखील नामांतर करण्यात आलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांत औरंगाबादचं देखील नामांतर करण्यात आलं होतं.

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून नामांतराची मोहीम तीव्र झालीय. मागील काही दिवसांत औरंगाबादचं देखील नामांतर करण्यात आलं. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) असं नामकरण करण्याचा शिंदे सरकारनं निर्णय घेतला. आता जिल्ह्यातील महत्त्वाच्या किल्ल्याचंही नामांतर केलं जाणार आहे.

औरंगाबादमधील (Aurangabad) पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या सुप्रसिद्ध दौलताबाद किल्ल्याचं (Daulatabad Fort) नाव बदलण्यात येणार आहे. या किल्ल्याला पुन्हा एकदा देवगिरी किल्ला असं नाव देण्यात येईल, अशी घोषणा भाजप नेते आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी केलीय. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या महारोजगार मेळाव्यात मंत्री लोढा बोलत होते.

दरम्यानच्या काळात देवगिरीचं नाव बदलून दौलताबाद करण्यात आलं होतं. आता पुढील हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनापर्यंत (Hyderabad Mukti Sangram) किल्ल्याचं नाव बदलून पुन्हा देवगिरी किल्ला (Devagiri Fort) असं नामकरण करण्यात येईल, अशी घोषणा मंगलप्रभात लोढा यांनी केली. आज सकाळीच लोढा यांनी किल्याला भेट दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: वॉशिंग्टन सुंदरची एकाकी झुंज, नाबाद अर्धशतक झळकावून वाढवली गतविजेत्यांची डोकेदुखी

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णय? पाटीदार अम्पायरकडे धावला, विराट संतापला... वॉशिंग्टनला परत बोलवल्याने राडा

SCROLL FOR NEXT