महाराष्ट्र

राज्यातील कोरोना मृत्यूदरात होतेय वाढ, हे कसले संकेत ?

सकाळवृत्तसेवा

मुंंबई : शर्थीचे प्रयत्न करून देखील राज्यात कोविड19 रुग्णांच्या मृत्यूदरात काहीशी वाढ झाल्याचे दिसते. आठवड्याभरपूर्वी 3.46 टक्के असणारा मृत्युदर 3.68 टक्क्यांवर गेला आहे. राज्यातील मृत्युदर हळूहळू वाढत असल्याचे दिसते.

राज्यात 6 जून रोजी कोविड19 रुग्णांची संख्या 74,860 इतकी होती तर 2587 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. राज्यातील मृत्युदर हा 3.46 इतका होता. तर 13 जून रोजी रुग्णांची संख्या 1,01,141 इतकी झाली तर 3,717 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूदरात 0.22 टक्क्यांनी वाढ होत मृत्युदर 3.68 टक्क्यांवर पोहोचला.

राज्यभरातील रुग्णांचा आकडा हा 1,07,958 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 3,950 रुग्ण दगावले आहेत. राज्यातील रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत असल्याचे दिसते. रुग्णालयात दाखल असलेल्या एकूण रुग्णांपैकी 4 टक्के रुग्ण हे गंभीर असून त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत. एकूण रुग्णांपैकी 70 टक्के रुग्णांना दीर्घकालीन आजार असून मृतांमध्ये दिर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांचा अधिक समावेश आहे.

राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढतांना दिसते. राज्यात दररोज सरासरी दीड हजार रुग्ज बरे होत असून राज्यात आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 50 हजार 978 झाली आहे. सध्या राज्यात केवळ 53 हजार 17 रुग्ण रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्यात सध्या 55 शासकीय आणि 42  खाजगी अशा एकूण 97 प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 6 लाख 56 हजार 739 नमुन्यांपैकी  1 लाख 7 हजार  958 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख  87 हजार  596 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 1535 संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  77 हजार 189 खाटा उपलब्ध असून सध्या 29 हजार 641 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

death rate of covid patients in maharashtra increased slightly read important news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर

T20 World Cup 2024 साठी भारताची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

Sharad Pawar : जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ ; शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT