Maharashtra Politics
Maharashtra Politics 
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणातून मोठी अपडेट; विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

धनश्री ओतारी

राज्याच्या राजकारणातून मोठी अपडेट समोर आली आहे. आमदार अपात्रतेच्या कार्यवाहीनीला वेग आला आहे. अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे.(Decision Soon On 16 Mlas Disqualification Legislature letter to the Central Election Commission)

विधीमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवल्याची माहिती मिळाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, विधीमंडळाकडून आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी केली आहे. गरज पडली तर लवकरच दोन्ही गटाच्या प्रमुखांना सुनावणीसाठी बोलावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Maharashtra Politics

विधीमंडळ सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांना म्हणणं मांडण्याची संधी देणार आहेत. "आम्हीच शिवसेना म्हणणाऱ्या" दोन्ही गटांना पुरावे सादर करावे लागणार आहेत. गरज भासल्यास दोन्ही नेत्यांची उलट तपासणीही घेण्यात येणार आहे. खरी शिवसेना कोणाची याबाबत अध्यक्ष सुरुवातीला निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय लवकर व्हावा यासाठी विरोधकांकडून सातत्याने दबाब आणला जात असतानाच आपण लवकरच क्रांतिकारक निर्णय घेणार असल्याचे सूचक वक्तव्य नार्वेकर यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. Maharashtra Politics

राज्यातील सत्तासंघर्षांवर निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाला एक महिन्याचा कालावधी होत असून अध्यक्षांनी लवकरच निर्णय घेतला नाही तर पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला. Maharashtra Politics

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Jain Video : राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर सुरेश जैन यांचा भाजपला पाठिंबा; म्हणाले...

Devendra Fadnavis : मोदी गरिबांचे मसिहा, काँग्रेसने स्वतःची गरिबी हटविली; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Afghanistan Floods : अफगाणिस्तानमध्ये महापूर, ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; अनेक घरं गेली वाहून

PM Narendra Modi : ''पाकिस्तानकडून कुणीही अणुबाँब खरेदी करत नाही'', मोदींचा काँग्रेसला टोला, म्हणाले...

Shirpur Jain News : पार्श्वनाथच्या मंदिरात पुन्हा तुंबळ हाणामारी, दोन जण जखमी

SCROLL FOR NEXT